उस्मानाबाद -: 40- उस्मानाबाद लोकसभा मतदार संघ सार्वत्रिक निवडणूकीसाठी टपाली मतपत्रिका व ईडीसी चे विहित नमुन्यातील मागणी अर्ज 10 एप्रिलपूर्वी सादर करण्याचे आवाहन निवडणूक यंत्रणेने केले आहे.
टपाली मतदान करु इच्छिणा-यांनी आपला विहित नमुन्यातील अर्ज सदर कक्षात सादर करुन मतदानाचा हक्क व कर्तव्य पार पाडावे. 10 एप्रिलच्यानंतर मागणी अर्ज स्वीकारले जाणार नसल्याचे कळविण्यात आले आहे.
242- उस्मानाबाद-कळंब विधानसभा मतदारसंघाचे टपाली मतदान व ईडीसीचे अर्ज स्वीकारण्यासाठी जुने उपविभागीय कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर येथे स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला असल्याचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, उस्मानाबाद यांनी कळविले आहे.