उस्मानाबाद -: 40-उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातर्गत जिल्ह्यात असणा-या 4 विधानसभा मतदारसंघनिहाय आज ईव्हीएम मशीनचे बॅलट युनिट व कंट्रोल युनिटचे पेअरिंग करण्यात आले. जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे आणि निवडणूक निरीक्षक रमेशकुमार मकाडिया यांच्या उपस्थितीत आज ही प्रक्रिया करण्यात आली.
आज सकाळी येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत असणाऱ्या सीलिंग हॉलमध्ये ही प्रक्रिया पार पडली. उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत सूर्यवंशी, परंडा विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संतोष राऊत, तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राम मिराशे आणि उमरगा मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र गुरव यांनी त्या-त्या मतदारसंघासाठीची मतदानयंत्रे ताब्यात घेऊन यापूर्वी पार पडलेल्या रॅंडमायझेशन प्रक्रियेनुसार मतदानयंत्र आणि कंट्रोल युनिट यांची जुळणी प्रक्रिया सुरु केली.
जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. नारनवरे आणि निवडणूक निरीक्षक श्री. मकाडिया हे स्वता या प्रक्रियेवर लक्ष ठेवून होते. आवश्यक त्या ठिकाणी त्यांनी संबंधित अधिकारी व कर्मचा-यांना सूचनाही केल्या. याशिवाय, उपजिल्हानिवडणूक अधिकारी प्रभोदय मुळे, ईव्हीएम कक्ष प्रमुख श्रीरंग तांबे यांच्यासह सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनीही यावेळी मतदान प्रक्रियेशी संबंधित अधिकारी-कर्मचारी यांना या जुळणीची माहिती दिली.
रॅंडमायझेशननुसार त्या-त्या मतदानकेंद्रासाठी देण्यात आलेले मतदान यंत्र आणि बॅलट युनिट यांची जुळणीही यावेळी करण्यात आली. ही प्रक्रिया महत्वपूर्ण असल्याने वरिष्ठ अधिकारी पूर्णवेळ याठिकाणी हजर होते.