पांगरी (गणेश गोडसे) :- कुत्र्याने मांजराचे पिल्लु खाण्याच्या किरकोळ कारणावरूण चौघांनी मिळुन दोघांना लाथाबुक्यांनी बेदम मारहाण करत जखमी केल्याची घटना कारी (ता. बार्शी) येथील पेठ भागातील वस्तीत घडली.
सुदर्शन रामलिंग गायकवाड व त्याची आर्इ अशी मारहानीत जखमी झालेल्यांची नांवे असुन बजरंग श्रीरंग गायकवाड, मनिषा बजरंग गायकवाड, श्रीरंग बाबु गायकवाड, द्रापती श्रीरंग गायकवाड, अशी मांजराच्या पिल्लाच्या कारणावरून मारहान करून जखमी करण्यास कारणीभुत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नांवे आहेत.
जखमी सुदर्शन गायकवाड यांनी पांगरी पोलिसात दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, आरोपींनी संगनमत करून तुमच्या कुत्र्याने आमच्या मांजरीचे पिल्लु खाल्ले असे म्हणत शिविगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केली. दरम्यान फिर्यादीची आर्इ ही भांडणे सोडवण्यास मध्ये गेली असता तिलाही मारहान करण्यात आली असल्याचे फिर्यादित म्हटले आहे. पांगरी पोलिसात चौघांविरूदध मांजराच्या खाण्याच्या कारणावरूण मारहान करून जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास हवालदार शिवानंद मोसलगी हे करत आहेत.