पांगरी (गणेश गोडसे) :- कुसळंब (ता. बार्शी) येथील कु. मानसी रविंद्र धावडे या इयत्ता तिसरीच्या विदयार्थीनीने फेब्रुवारी 2014 मध्ये घेण्यात आलेल्या आय.टी.एस परीक्षेत राज्यात दुसरा क्रमांक मिळवुन घवघवीत यश संपादन केले आहे.
खामगांव येथील सौ. मार्इ. गं.सोपल प्राथमिक आश्रमशाळेत तिसरीत शिकत असलेल्या कु.धावडे हिने सेंट्रल प्रकाशन कोल्हापुर यांच्यातर्फे घेण्यात येणा-या राज्यस्तरीय आय.टि.एस. परीक्षेत 300 पैकी 282 गुण मिळवुन राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. तिला एस.एस.कोळी यांचे मार्गदर्शन लाभले. उज्वल यश प्राप्त केल्याबदल संस्थाध्यक्ष प्रभाकर डमरे, मुख्याध्यापक तांबडे, सचिन डमरे यांच्यासह इतरांकडुन तिचे अभिनंदन होत आहे.