मंगळवेढा (समाधान फुगारे) : मंगळवेढ्यातील दामाजी पंत व चोखामेळा यांची 10 ते 15 मे दरम्यान यात्रा भरणार असून यंदाच्या यात्रेत भरग्च्चं कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याचे नियोजन करण्यासाटी रविवारी संत दामाजी मंदिरात बैठक घेण्यात आली.
यात्रा काळात कविसंमेलन, नाटक, तमाशा, धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा आठवडा बाजारात जनावरांचा बाजार भरणार असून शहरात यात्रा काळात नामवंत कंपनीचे स्टॉलही लागणार आहेत. सकाळी शहरातून दिंडी काढन्यात येणार असून मंदिरात धार्मिक कार्यक्रम तर दामाजी रोड वरील शिंदे यांच्या खुल्या जागेत यात्रे निमित्त विविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत. आंतराष्ट्रीय पातळीवर दामाजी व चोखामेळाची अख्ख्यायीका पसरली आहे. नव्या पिढीला माहिती होण्यासाठी ही यात्रा भरवली जाणार आहे.
या बैठकीस मंगळवेढा संतभूमी विकास समितीचे अध्यक्ष समाधान आवताडे, दामाजी संस्थेचे अध्यक्ष विष्णुपंत आवताडे, भाजपचे तालुकाध्यक्ष शशिकांत चव्हाण, महाविद्यालयाचे प्राचार्य शुभाष कदम आदि उपस्थित होते.