नळदुर्ग :- शुक्रवार रोजी सायंकाळी जळकोट (ता. तुळजापूर) शिवारात भरधाव ट्रक्टर ट्रॉली उलटून झालेल्या अपघातात 20 मजूर गंभीर जखमी झाल्याची घटना होऊन उपचारादरम्यान दोन महिला मरण पावल्या. याप्रकरणी चालकाविरुध्द पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सौ. लक्ष्मीबाई शेषेराव कदम (वय ५०) आणि चाँदबी रशिद मुलानी (वय ५०) (दोघे रा. जळकोट, ता. तुळजापूर) असे अपघातात मरण पावलेल्या शेतमजुर महिलांचे नाव आहे. तर जळकोट येथील कालिदास माणिक कदम (वय ३०), अनसया राम जाधव (वय ४५), छाया काशिनाथ जाधव (वय ३०), धोंडाबाई राम पवार (वय ४५), कावेरीबाई शिवाजी बारदाने (वय ३५), सुरेखा मोतीराम जाधव (वय ४०), महानंदा धोंडीराम अंगुले (वय ३५), सुनिता चंद्रकांत पांचाळ (वय ३५), उज्वलाबाई श्रीशैल्य दरेकर (वय ३५), मिराबाई आण्णाप्पा सोनटक्के (वय १८), लालू काशिनाथ चव्हाण (वय ३५) तर राम तिर्थ तांडा येथील लक्ष्मण पवार (वय ४०), छबिना लक्ष्मण पवार (वय ३०), रेश्मा नबी शेख (वय ४०), माणिक कदम (वय ४९), सुक्षाबाई मोरे (वय ४७), मिरा कदम (वय ३५), रूक्मीनबाई भोसले (वय ४८) असे अपघातातील जखमींचे नावे आहेत. तर मनोज गुरुनाथ कांबळे असे गुन्हा दाखल झालेल्या ट्रक्टर चालकाचे नाव आहे.
शुक्रवार दि. 18 एप्रिल रोजी सायंकाळी शेतातील काम संपवून शेत मजुर जळकोट गावाकडे ट्रक्टर (एम.एच.२५ एच.२५४३) व ट्रॉली (क्र.एमएच २५/ जी १0२) यामध्ये बसून जात होते. ट्रॅक्टर जळकोट-हंगरगा रस्त्यावरील जळकोट गावाजवळ आला असता रस्त्यावर आलेल्या जनावरांना चुकविण्याचा प्रयत्नात ट्रॅक्टर चालक मनोज गुरुनाथ कांबळे याने ब्रेक मारले असता ट्रॉली उलटली. झालेल्या गंभीर अपघातात ट्रॉलीतून प्रवास करणारे मजूर ट्रॉली बाहेर फेकले गेले. तर काहीजण ट्रॉलीखाली अडकून जखमी झाले. ट्रॅक्टरमधील २० मजुर जखमी झाले. ही घटना कळताच ग्रामस्थांनी जळकोट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जखमींना उपचारासाठी दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कदम, डॉ. सी.जी. गायकवाड, डॉ. मोजगे यांनी तात्काळ जखमींवर प्राथमिक उपचार केले. काही रूग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना सोलापूर येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र सोलापूर येथे उपचार सुरू असताना लक्ष्मीबाई कदम, चाँदबी मुलानी या दोघींचा मृत्यू झाला. तर अपघातात १८ जण जखमी झाले आहेत. त्यात १५ महिलांचा समावेश आहे.
अपघाताची माहिती समजताच नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक एम.वाय. डांगे, पो.कॉ. सुनिल मनगिरे, संजय सुर्यवंशी यांच्यासह पोलीस कर्मचा-यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमींना वेद्यकीय उपचारासाठी मदत केली. रोहित राम कदम (रा. जळकोट) यांच्या फिर्यादीवरुन ट्रक्टरचालक मनोज गुरुनाथ कांबळे याच्यावर नळदुर्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि एम.वाय. डांगे हे करीत आहेत.