उस्मानाबाद : दुधगाव (ता. उस्‍मानाबाद) येथील राष्‍ट्रवादीच्‍या कार्यकर्त्‍यांनी आमदार ओमराजे निंबाळकर यांच्‍या उपस्थितीत शिवसेनेमध्‍ये जाहीर प्रवेश केला.
    दुधगाव येथील राष्‍ट्रवादीचे कार्यकर्ते आलम सय्यद, हसन पठाण, काका कसबे, कयुम मुलाणी, हजम पठाण, हमजू सय्यद, अली सय्यद, आयास पटेल, बालाजी कसबे, जिलानी पठाण, गफूर सय्यद, अब्दुल शेख, शिवाजी कसबे, खलिल शेख, उस्मान पठाण, गणपतराव कसबे आदी कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी धाराशिव साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पाटील उपस्थित होते.
सरपंच घुटुकडे यांचा शिवसेनेत प्रवेश
उस्‍मानाबाद तालुक्यातील वाणेवाडी येथील राष्ट्रवादीच्या महिला सरपंच मीराताई घुटुकडे यांनी गुरुवारी ओमराजे निंबाळकर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक सतीशकुमार सोमाणी व गावातील नागरिक उपस्थित होते.
 
Top