मूकबधिर पीडित मुलगी आपल्या घरात एकटीच असताना दोन तरुणांनी घरात घुसून मुलीवर सामूहिक बलात्कार केला. सकाळी नऊ वाजल्याच्या सुमारास हा प्रकार घडला. नकोडे येथील ही १७ वर्षाची मुलगी घरात एकटीच असल्याचं हेरून दोन तरुण जबरदस्तीनं तिच्या घरात घुसले. याप्रकरणी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
पीडित मुलगी तिच्या आई, वडील आणि बहिणीसोबत राहते. आई वडील घरी आल्यावर मुलीने घडलेला प्रकार घरात सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांनी कोपरखैराणे पोलीस स्टेशन गाठलं आणि तक्रार नोंदविली. पोलिसांनी या प्रकरणी मुलीची वैद्यकीय चाचणी करून तक्रार नोंदवून घेतलीय.
या प्रकरणात पोलिसांनी याच परिसरात राहणा-या एकाला ताब्यात घेतलंय. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार ताब्यात घेतलेला व्यक्ती हा मुलीच्या ओळखीचा असून दुस-या आरोपीचा शोध सुरू आहे