नळदुर्ग -: उस्मानाबाद लोकसभा निवडणूकीसाठी मतदान प्रक्रिया गुरुवार रोजी पार पडली. कार्यकर्त्यांनी एकदाचा सुटकेचा निश्वास टाकला. निवडून कोण येईल, कुणाची सीट बसेल, कोणत्या भागात कोणत्या उमेदवाराला किती मतदान मिळणार, याबाबत सर्वत्र फोनवरुन मतदारसह कार्यकर्ते शुक्रवार रोजी एकमेकांस माहिती विचारुन चर्चा करत होते. दरम्यान, नळदुर्ग येथील 13 मतदान केंद्रावर शांततेत सरासरी 56 टक्के मतदान झाले.
सोळाव्या लोकसभा निवडणुकीसाठी नळदुर्ग येथे सकाळपासून मतदानास सुरुवात झाले. सायंकाळी सहा वाजेपर्यंत नळदुर्ग शहरातील 13 केंद्रावर 13 हजार 500 मतदारांपैकी 7 हजार 587 मतदारांनी मतदान केले. नळदुर्गपासून जवळच असलेल्या येडोळा व जकनी तांडा येथील मतदारांना मतदान करण्यासाठी खुप दुरपर्यंत जावे लागले. मतदाराना मतदानाचा हक्क बजावता, यावा यासाठी निवडणूक विभागाने सर्वत्र मतदान केंद्राची सोय केली होती. मात्र जाकणीतांडा येथील मतदान केंद्र ३२४ वर २१५ मतदारांची यादी आहे. या यादीत येडोळा येथील ५0 नागरिकांची नावे आली आहेत. तर येडोळा येथील मतदान केंद्र ३२३ वर ९९७ मतदारांची यादी असून या यादीमध्ये जकणी तांड्यावरील २६५ मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. वास्तविक पाहता हे दोन्ही तांडे एकमेकांपासून खूप दूर अंतरावर आहेत. त्यामुळे मतदारांना नाहकच पायपीट करावी लागली. तर अनेक मतदारांनी उन्हात पायपीट नको म्हणून मतदानाकडे पाठ फिरविल्याचे निदर्शनास आले.
दरम्यान, मतदानाच्या दुस-या दिवशी म्हणजे शुक्रवार रोजी उस्मानाबाद खासदारकीची विजयश्रीची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, याबाबत उत्सुकता जिल्ह्यातील सर्वांना लागली असून सकाळपासूनच अनेकजण फोनवरुन मित्रांना, नातेवाईकांना विचारणा करीत असल्याची चर्चा आहे.