तुळजापूर :- मोर्डा (ता. तुळजापूर) येथे बैलाने मारल्याने एका शेतक-याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना बुधवार रोजी घडली.
विश्वनाथ धोंडीबा साठे (वय 60, रा. मोर्डा, ता. तुळजापूर) असे बैलाने मारल्याने मृत्यू झालेल्या शेतक-याचे नाव आहे. यातील विश्वनाथ साठे हे आपल्या शेतात सायंकाळच्या सुमारास काम करीत असताना त्यांना बैलाने जोराची धडक दिली. यात साठे हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता, त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीसात आकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.