नळदुर्ग :- भगवान महावीर यांची जयंती नळदुर्ग येथे विविध कार्यक्रमाने व मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी भगवान महावीरांच्या प्रतिमेची नळदुर्ग शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत जैन युवक व महिला मोठ्या संख्येनी सहभागी झाले होते. यावेळी 'जिओ और जिने दो' अशा घोषणा देण्यात आल्या. दुपारी एक वाजता भगवंतांच्या महाभिषेक करण्यात आला. तर दुपारी दोन वाजता समीर घनशेट्टी यांच्यावतीने उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सायंकाळी सात वाजता प्रा. धन्यकुमार बिराजदार यांचे प्रवर्चन झाले. या कार्यक्रमानंतर सांस्कृतिक कार्यक्रम व भगवान महाविरांच्या पाळण्याचा कार्यक्रम उत्साहात झाला. कार्यक्रम यशस्वी करण्याठी माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक नितीन कासार, माजी पोलीस पाटील सुर्यकांत पाटील तसेच जैन युवक मंडळ, जैन युवा मंच, जैन महिला मंडळ यांच्यासह युवकांनी पुढाकार घेतला.