नळदुर्ग :- इटकळ (ता. तुळजापूर) येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 123 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच अझर मुजावर, माजी सरपंच अरविंद पाटील, अब्दुल शेख, महेंद्र भोसले, पत्रकार अशपाक मुजावर, दिनेश सलगरे, हैदर शेख यांच्यासह गावातील नागरीक. यावेळी डॉ. आंबेडकर यांच्या जीवन चरित्राविषयी माहिती देण्यात आली. या कार्यक्रमास विलास दुपारगुडे, राहुल बागडे, मारुती बागडे आदीजण उपस्थित होते.