पांगरी (गणेश गोडसे) : पांगरी (ता. बार्शी) परिसरात बुधवारी दुपारी तिन वाजता वादळी वा-यासह व विजेच्या गडगडाटात दोन तास अवकाळी पाऊस झाला असुन वीज घासुन गेल्यामुळे कुसळंब येथील सोपान कृष्णा काशिद हे 63 वर्षीय वृदध भाजल्यामुळे गंभिर जखमी झाले.
कारी येथील एका शेतक-यांच्या सुरू असलेल्या ज्वारीच्या खळयावर वीज पडुन जळुन खाक झाले असुन सुदैवाने खळयाजवळ कोणीही नसल्यामुळे जिवितहानी टळली. अवकाळी पावसामुळे पांगरी भागातील ज्वारी, गहु, आंबा आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दुपारपासुनच आकाशात काळे ढग जमा होऊ लागले होते. विजांचा कडकडाटही होत होता. मात्र दुपारी 3 वाजता गडगटासह वादळी वारा व भितीसदृष्य विजांचा गडगडाट यामुळे भितीयुक्त वातावरण तयार झाले होते. अचानक वादळी वा-यासह पावसाला प्रारंभ झाला. वरूणराजाने चांगलीच हजेरी लावली.
यादरम्यान एक तासाच्या आसपास व पुन्हा थोडया वेळाने पुन्हा पावसाने हजेरी लावली. दोन दिवसांपासुन असेच वातावरण या भागात असल्यामुळे आजही वरूणराजा येथे हजेरी लावणार नाही अशी आशा शेतक-यांना होती. अवकाळी पावसाच्या फटक्यामुळे कडबा, ज्वारी काळे पडले असुन गहु पांढरा पडला आहे. शेतक-यांना अवकाळी पावसाचा जोरदार फटका सहन करावा लागला आहे. आधीच दुष्काळच्या छायेत सापडलेल्या शेतक-यांचे अवकाळी पावसाने कंबरडेच मोडले आहे. पांगरी परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. निसर्गाच्या लहरीपणापुढे शेतकरी पुरता हतबल झाला आहे. निसर्गाने एका क्षणात शेतक-यांचे आर्थिक स्वप्न उदधवस्त केले. पांगरीसह उक्कडगांव, पांढरी, चिंचोली, चारे शिराळे, पिंपळवाडी, धानोरे, आगळगांव आदी भागातही पाऊस पडल्याचे वृत्त आहे.