बार्शी :- गुरुवार रोजी अवेळी झालेल्या जोरदार पावसात वीज पडल्याने एका मृत्यू तर पाचजण जखमी झाले. तसेच दोन बैल एक गाय दगावल्याची घटना बार्शी तालुक्यात घडली.
सारोळे ता.बार्शी येथील वामन नागनाथ दिलपाक (वय ५५) यांचा मृत्यू झाला आहे. सोपान कृष्णाथ काशीद वय ७५ रा.कुसळंब, दगडू शिवाजी जाधव वय ५०, काशीबाई दगडू जाधव वय ४५, राहुल दगडू जाधव वय २२, अश्विनी दत्तात्रय जाधव वय ४० हे जखमी झाले आहेत. बार्शी तालुक्यातील चिखर्डे येथे एक बैल, बावी (आ.) येथे एक बैल, कोरेगाव येथे एक गाय मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली आहे.