बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील बार्शी हा विधानसभा मतदारसंघ उस्मानाबाद लोकसभा मतदार संघाला जोडला गेला आहे. सायंकाळी ६ पर्यंतच्या एकूण मतदानातील टक्केवारीत बार्शी विधानसभेतून सरासरी ६२.३४ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. तर गोडसेवाडी वस्ती येथील संपूर्ण २४९ मतदारांनी रस्ते, पाणी आणि स्वतंत्र ग्रामपंचायतीच्या मागणीसाठी मतदानावर बहिष्कार टाकला आहे.
दुपारी पावणेतीनच्या दरम्यान वीजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. जवळपास अर्धातास पाऊस झाल्यानंतर मतदारांनी पुन्हा बुथवर गर्दी केली. २४६ बार्शी विधानसभा मतदारसंघात एकूण मतदारांत स्त्री १,३२,७३१ पुरुष १,४७,६६९ असे एकूण २,८०,४०० मतदार आहेत त्यापैकी झालेल्या मतदानात स्त्री ९६,१४६ तर पुरुष ७८,६४२ अशा एकूण १,७४,७८८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सकाळी ७ ते ९ पर्यंत एकूण २४,४४३ मतदारांनी केलेल्या मतदानात ८,७ % मतदान झाले, दु.११ पर्यंत ४४,२२१ मतदारांनी केलेल्या मतदानात १४.७५ % मतदान झाले. दुपारी १ पर्यंत १,०७,४६४ मतदारांनी केलेल्या मतदानात ३८.३३ % मतदान झाले. दुपारी ३ पर्यंत १,३८,३५७ मतदारांनी केलेल्या मतदानात ४९.३४ % मतदान झाले. दुपारी ५ पर्यंत १,६२,७३१ मतदारांनी केलेल्या मतदानात ५८.०३ % मतदान झाले. शेवटी सायं.६ पर्यंत झालेल्या एकूण मतदानात १.७४,७८८ मतदारांनी केलेल्या मतदानाते बार्शी विधानसभा मतदारसंघातून ६२.३४ % मतदान झाले.