पांगरी (गणेश गोडसे) :- सोळाव्या लोकसभेच्या तिस-या टप्यात पांगरी (ता. बार्शी) पोलिस ठाण्याच्या हदीतील 59 गांवात लोकसभेसाठी किरकोळ बाचाबाचीचे प्रकार वगळता शांततेत मतदान प्रकिया पार पडले. पांगरी येथे आज अवकाळी पावसाची दमदार हजेरी मतदान केंद्रात विजेचा अभाव लोकसभेसाठी अतिशय चुरशीने मतदान प्रकिया पार पडुन पांगरीत लोकसभेसाठी प्रथमच 66 टक्के मतदानाची नोंद झाली. पांगरीत विजप्रवाह खंडित झाल्यामुळे व कांही ठिकाणी पर्यायी विजेची व्यवस्था नसल्यामुळे मतदारांना अंधारातच मतदानाचा हक्क बजावावा लागला. पांगरीतील पाच बुथ केंद्रातुन पाचहजार मतदारांपैकी 3242 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
पांगरी शेजारील कारी येथे 3947 मतदारांपैकी 2518 मतदारांनी मतदान केले तर चिंचोली येथे 798 मतदारांपैकी 525, घेळवेवाडी येथे 1120 पैकी 601, शिराळे येथील 1356 पैकी 984 तर आगळगांव येथे 3445 पैकी 981 मतदारांनी मतदान केले. सकाळी सुरूवातीला पांगरी भागात मतदानाचा वेग मंदच होता. दुपारनंतर मतदानाचा वेग वाढला. लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात पांगरी सारख्या संवदनशील गावात प्रथमच कोणताही अनुचित प्रकार न घडता मतदान प्रकिया शांततेत पार पडली. सन 1977 नंतर प्रथमच लोकसभेसाठी 66 टक्के मतदानाची नोंद झाली.
पांगरी पोलिस ठाण्याच्या हदीतील 59 गांवांमधील 59 र्इमारतीमधुन व 87 बुथमधुन ही मतदानाची प्रकिया पार पडली. पोलिस निरीक्षकास सहा पोलिस उपनिरीक्षक, 75 पोलिस कर्मचारी व 20 गृहरक्षक दलाच्या जवानांनी शांततेत मतदान प्रकिया पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.