पांगरी (गणेश गोडसे) -: बार्शी तालुक्यासह महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादक शेतक-यांना फसवुन लाखो रूपयांला चुना लावणा-या व्यापा-यांनी अतिशय नियोजनबध्द कार्यक्रम आखुन आपला उददेश साध्य केला आहे. व्यापारी शेतक-यांची फसवणुक करून गेल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी समोर येऊ लागल्या असुन शेतक-यांच्या वैयक्तीकक खात्यावरील पैसै हडप करण्यातही व्यापा-यांनी कोणतीच कमतरता ठेवलेली नसल्याचे समोर आले आहे. सुरतच्या विराने मुंबर्इतील एका व्यापा-यास हाताशी धरून भागीदारीत व्यापार करण्याचे ठरवुन मुंबर्इतील त्या स्थानिक व्यापा-यांचे बँक खाते व्यवहारासाठी वापरत त्याच्याच खात्याचे धनादेश महाराष्ट्रातील शेतक-यांना वाटप केले. ज्या व्यापा-याने आपल्या खात्याचे धनादेश वाटप केले. त्यावर सहया मात्र बनावटच केल्या. मात्र सुरतेच्या लुटारूंनी पांगरी भागातील द्राक्ष उत्पादकांना लुटण्याचा कार्यक्रम तीन वर्षांपुर्वीच आखला असल्याचे उघडकीस आले आहे. ओम विर नावाच्या सुरतेच्या लुटारूने तीन वर्षांपुर्वीच पांगरीत येऊन अंदाज घेऊन येथे द्राक्षे खरेदी करण्यासाठी दलाल उपलब्ध होतो का याचा अंदाज घेतला होता. मात्र तीन वर्षांपुर्वी या सुरतेच्या व्यापा-याला पांगरी भागात एकही स्थानिक दलाल उपलब्ध होऊ न शकल्यामुळे तीन वर्षांपुर्वीच बार्शी तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांना गंडा घालण्यासाठी आलेल्या विराच्या आशेवर पाणी पडले होते. निराश होऊन त्याने बार्शी तालुका वगळुन महाराष्ट्रातील इतर भागात बस्तान बसवुन तेथील स्थानिक नागरीकांना हाताशी धरून शेतक-यांना गंडा घातला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र तीन वर्षांपुर्वी बार्शी तालुक्यातील शेतक-यांवर आलेले द्राक्षांना टोप्या घालण्याचे संकट कांही केल्यास पाट सोडण्यास तयार नसल्याचे निदर्शनास आले आहे. सन 2012 मध्ये ज्या व्यापा-यांने द्राक्षे खरेदी करून द्राक्ष उत्पादकाला लुबाडण्याचे नियोजन केले होते. ते नियोजन त्यांनी 2014 मध्ये यशस्वी केले.
    फसवणुकीबरोबरच शेतकरी व कामगारांचे ए.टी.एम.चा वापर
शेतक-यांचे सर्वस्व लुटुन नेलेल्या सुरत व आग्राच्या व्यापा-यांनी फक्त महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादक शेतक-यांचे द्राक्षे घेऊन जावुनच फक्त लुबाडणुक केली नसुन भुम (जि. उस्मानाबाद) तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतक-यांचा व द्राक्षांची भरणी करणा-या कामगारांचा सुरवातीला विश्‍वास संपादन करत त्यांच्या बँक खात्याचा राजरोसपणे सुरळीत वापर केला. भोळया भाबडया शेतक-यांनीही खुलेपणाने त्या व्यापा.यांना आपले बँक खाते ए.टी.एम.कार्ड व त्याचा गुप्त कोड देऊन टाकला. भुम तालुक्यातील ज्या शेतक-यांच्या सुरूवातीला द्राक्ष बागा खरेदी केल्या त्यांचे पैसैही त्या व्यापा-याने अतिशय चलाखीने पुन्हा त्याच्या व्यवहारात वापरले व तेथील द्राक्ष बागांचा हंगाम संपत आल्यानंतर या सुरतेच्या लुटारूने भुम तालुक्यातील स्थानिक शेतक-यांना पांगरी भागात सोबत घेऊन येऊन नाती गोती उघड करत द्राक्ष बागा मिळवण्यासाठी उपयोग केला. ज्या शेतकरी व त्याच्याकडील कामगारांचा द्राक्ष बागा घेण्यासाठी उपयोग करून घेतला त्यांनाही झटका देण्यात या सुरतेच्या व्यापा-यांनी कसुर केली नाही. ज्या कामगारांच्या व शेतक-यांच्या ताटात बसुन एकत्रित जेवण घेतले त्यांनाही या व्यापा-यांनी लुबाडले. व्यापा-यांनी विश्‍वासाने शेतकरी व कामगारांच्या घेतलेल्या ए.टी.एम कार्डचा गैरवापर करत कामगार व शेतक-यांच्या वैयक्तिक बँक खात्यावरील रक्कमही त्यांच्या परस्पर काढुन घेतली. व्यापा-यांनी ए.टी.एमचा वापर या भागातुन व राज्यातुन पळुन गेल्यानंतर केला असल्याचे उघड झाले आहे. अनेकांची बँक खाती या व्यापा-यांनी झिरो बॅलन्सवर आणुन सोडली आहेत.
 
Top