उस्मानाबाद -: मुक्त आणि निर्भय वातावरणात निवडणुका व्हाव्यात यासाठी निवडणूक यंत्रणेतील प्रत्येक घटकाने दक्ष राहावे. निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणणा-यांची कोणत्याही परिस्थितीत गय केली जाणार नाही, असा इशारा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिला.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. नारनवरे आणि उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठीचे निवडणूक निरीक्षक रमेशकुमार मकाडिया यांनी विविध अधिका-यांची बैठक घेऊन निवडणूक विषयक कामकाजाचा आढावा घेतला. जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अपर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील, अपर पोलीस अधीक्षक बाळकृष्ण भांगे यांच्यासह मतदारसंघातील सर्व विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, विविध विभागांचे कक्ष प्रमुख यांची यावेळी उपस्थिती होती.
आदर्श आचारसंहिता काळात कोणत्याही परिस्थितीत कायदा व सुव्यवस्थेची घडी बिघडणार नाही, याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. प्रत्येकाने आपल्या कार्यक्षेत्रात त्यादृष्टीने सर्व प्रतिबंधात्मक कार्यवाही केली पाहिजे. मतदानाच्या दिवशी प्रत्येक नागरिकाला निर्भयपणे मतदान करता येईल, असे वातावरण असले पाहिजे. असे वातावरण निर्माण करणे ही प्रशासन म्हणून आपली जबाबदारी आहे. त्यामुळे मतदान केंद्रांत पुरेशा सोईसुविधा, भयमुक्त वातावरण याला आपले प्राधान्य राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
ज्या मतदान केंद्रांवर मागील निवडणुकीत कमी मतदान झाले, कायदा सुव्यवस्था विस्कळित करण्याचे प्रयत्न झाले, अशा मतदान केंद्रांवर प्रशासनाचे विशेष लक्ष राहणार आहे. मतदारांना कोणीही मतदान करण्यापासून परावृत्त करु नये यासाठी या मतदान केंद्रांवर वेब कॅमेराच्या माध्यमातून प्रशासनाची नजर राहणार आहे.
निवडणूक प्रक्रियेत असणाऱ्या प्रत्येक अधिकारी-कर्मचारी यांनी सकारात्मक पद्धतीने आणि समन्वयाने आपली जबाबदारी पार पाडावी. प्रत्येकाने त्यांना नेमून दिलेली जबाबदारी योग्यरित्या पार पाडणे अभिप्रेत आहे. त्यासाठी प्रत्येक काम हे वेळेवर होईल, हे पाहिले पाहिजे.
आवश्यक त्या ठिकाणी प्रतिबंधात्मक कारवाई करावी. समाजकंटकावर कारवाई करताना कोणतीही तमा बाळगू नका. निर्भय व मुक्त वातावरणात निवडणुका ही आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याचे त्यांनी बजावले.
निवडणूक निरीक्षक मकाडिया यांनी यावेळी प्रत्येक निवडणूक हा वेगळा अनुभव असतो, असे नमूद केले. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने आवश्यक ती सर्व खबरदारी घ्या असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी विविध अधिका-यांनी त्यांना भेडसावत असणाया अडचणी मांडल्या. यावर सर्व शंकांचे निरसन मकाडिया आणि डॉ. नारनवरे यांनी यावेळी केले.