बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : सुभाष नगर येथील गणेश तलावात सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची फिर्याद बार्शी पोलिसांत दाखल झाली आहे. याबाबत सासू, सासरा, दीर व पती यांना पोलिसांनी अटक केली आहे.
    तृप्ती सुरवसे (वय ३०) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. नानासाहेब रोहिटे रा.झाडबुके मैदान यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली. तेजस सुरवसे (पती), विलास सुरवसे (सासरा), छाया सुरवसे (सासू), गणेश सुरवसे (दीर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तृप्ती व तेजस यांचा विवाह झाल्यानंतर त्यांना दोन मुली झाल्या. मुलगा होत नाही म्हणून तिचा छळ होत होता. यानंतर तेजसचे दुसर्‍या मुलीबरोबर दुसरे लग्न लावण्यात आले त्यामुळे तिने पेटवून घेण्याचाही प्रयत्न केला होता. घटनेचा अधिक तपास पो.ह.सुनिल बनसोडे हे करीत आहेत.
 
Top