पांगरी (गणेश गोडसे) :- शिवीगाळ दमदाटी करत पाचजणांनी दुचाकी पेटवुन देऊन नुकसान केल्याची घटना मंगळवार दि. 1 एप्रिल रोजी दुपारी वालवड (ता. बार्शी) येथे घडली.
फुलचंद भानुदास जाधवर (वय 44, रा. वालवड) यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी देविदास नानाभाऊ मुंढे, बालाजी देविदास मुंढे, कैलास देविदास मुंढे, हनुमंत देविदास मुंढे, नितिन गोकुळ गोरे सर्व (रा. उपळाई, ता.कळंब, जि. उस्मानाबाद) यांनी संगनमत करून गैरकायद्याची मंडळी जमवुन त्यांच्या घरासमोर येऊन त्यांना शिविगाळ दमदाटी करत त्यांच्या मालकीची दुचाकी क्रमांक एम.एच.13 जी.9411 ही दुचाकी पेटवुन देऊन वीस हजार रूपयांचे नुकसान केले.
फुलचंद जाधवर यांच्या फिर्यादिवरूण कळंब तालुक्यातील पाचजणांविरूदध दुचाकी पेटवुन शिवीगाळ दमदाटी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असुन अधिक तपास हवालदार जनार्धन सिरसट हे करत आहेत़.