पांगरी (गणेश गोडसे) :- पांगरी (ता. बार्शी) पोलिस ठाण्याच्या हदीत नारी व धोत्रे येथे माहेरहुन पैसै घेऊन येण्‍या कारणावरूण वेगवेगळया दोन घटनांमध्ये जाचहाटाच्या घटना घडल्या असुन याप्रकरणी पिडीत दोन पिडीत महिलांनी आपल्या पतीसह नातेवाईकांविरूदध जाचहाटांच्या तक्रारी दिल्या आहेत. पांगरी पोलिसात धोत्रे (ता. बार्शी) येथील विविहीतेने दिलेल्या तक्रारीवरून शिक्षकाविरूदध जाचहाटाचा गुन्हा दाखल झाला आहे.
    पहिल्या घटनेत धोत्रे येथील शोभा विश्‍वास सोनवणे (वय 23) या विवाहितेने दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, आरोपी शिक्षक पती विश्‍वास रामचंद्र सोनवणे यांनी 2009 पासुन आजतागायत त्यांना माहेरहुन 200000 लाख रूपये घेऊन ये या कारणावरून वारंवार शिविगाळी दमदाटी करत लाथाबुक्यांनी मारहान करून उपाशीपोटी ठेऊन शारीरीक व मानसिक छळ केला. छळाच्या घटना मोहोळ व धोत्रे येथे घडल्या आहेत. विश्‍वास सोनवणे हे मोहोळ तालुक्यातील वडदेगांव येथे जि.प.शिक्षक म्हणुन कार्यरत असुन शोभा सोनवणे यांच्या तक्रारीवरून जाचहाट व शारीरीक छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्‍या आला आहे.या घटनेचा तपास हवालदार रविंद्र भडुरे हे करत आहेत.
   तर दुस-या घटनेत पिडीत महिला सुरेखा कुबेर दिडवळ (वय 30, रा. नारी, ता.बार्शी) यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, आरोपी पती कुबेर रामलिंग दिडवळ, दिर धनाजी रामलिंग दिडवळ, प्रकाश रामलिंग दिडवळ, मनिषा धनाजी दिडवळ, पुजा प्रकाश दिडवळ व सासु सधामती रामलिंग दिडवळ यांनी गत एक वर्षांपासुन फिर्यादीस माहेरहुन शेतीसाठी पन्नास हजार रूपये घेऊन ये या कारणावरून वारंवार शिविगाळी दमदाटी करत मारहाण करूण शारीरीक मानसिक छळ केला. सुरेखा दिडवळ या अत्याचारीत महिलेल्या फिर्यादिवरून सासरच्या पाचजणांविरूदध जाचहाट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा तपास हवालदार जनार्धन सिरसट हे करत आहेत.
 
Top