मंगळवेढा (समाधान फुगारे) :- मंगळवेढा शहरातील किल्ला भागाध्ये राहणारी एक १७ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनी बेपता झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
    स्‍नेहा ज्ञानेश्‍वर जावळे (वय 17 वर्षे, रा. बोराळे, ता. मंगळवेढा) असे बेपत्‍ता झालेल्‍या विद्यार्थिनीचे नाव आहे.  मंगळवेढा तालुक्यातील बोराळे येथील कु. स्नेहा जावळे मुलगी मंगळवेढा येथे 11 वीच्या वर्गात शिकत आहे. सध्‍या ती शहरातील किल्ला भागात शिक्षणासाठी रुम करुन भाड्याने राहत होती.  सोमवार दि. 28 मार्च रोजी ती गावाकडे जाते असे म्हणून गेली, परंतु ती परत आलीच नाही.  याबाबत तिची आई रतन द्यानेश्वर जावळे हिने मंगळवेढा पोलिसात तक्रार नोंदवली असून अधिक तपास दत्तात्रय तोंडले हे करीत आहेत.
 
Top