बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: विरोधी पक्षाचे नरेंद्र मोदी यांच्या गुजरात राज्याच्या जाहीराती प्रसारमाध्यमांवर दाखविण्यात येत असल्या तरी वस्तुस्थिती वेगळी आहे. लोकांना आकर्षित करण्यासाठी गुजरात हे एकमेव राज्याचा विकास झाल्याचा आभास निर्माण केला जातो परंतु शैक्षणिक, मानवी निर्देश, औद्योगिकरण, स्वच्छतेच्या बाबत केवळ महाराष्ट्रच नंबर एकचे राज्य आहे असे मत सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप सोपल यांनी व्यक्त केले.
     उपळाई-ठोंगे (ता.बार्शी) येथील डॉ.पद्मसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी आण्णा बोटे, कॉंग्रेसचे निष्ठावंत रमजानभाई पठाण, अब्बासभाई शेख, उपनगराध्यक्ष राहुल कोंढारे, गटनेते नागेश अक्कलकोटे, रामेश्वर मांजरे, ऍड्.विकास जाधव, सचिन धस, अमोल गुडे, युवराज काटे, अलिम शेख, जयवंत कदम, उध्दवराव पाटील, दत्ताआण्णा शिंदे आदी उपस्थित होते.
 
Top