शरद घावटे
पांगरी (गणेश गोडसे) -: पांढरी (ता. बार्शी) येथील शरद रामलिंग घावटे यांची मंत्रालय सहाय्यकपदी निवड झाली आहे.
    महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 2013 मध्ये घेण्‍यात आलेल्या परिक्षेत शरद घावटे हे राज्यात अठराव्या क्रमांकाने घवघवित यश संपादन करीत उतिर्ण झाले. सामान्य परिस्थतीची जान असल्यामुळे पांढरीसारख्या डोंगरी भागातुन कष्‍ट घेऊन शरद घावटे सारखे विद्यार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परिक्षा गुणवत्तापुर्ण यशस्‍वी झाले. शरद घावटे यांचे प्राथमिक शिक्षण पांढरी येथे तर माध्यमिक शिक्षण पांगरी येथे झाले. पुढील उच्च शिक्षण परभणी व बार्शी येथे झाले.
  जिद्द चिकाटी व कांहीतरी करून दाखवायची उमीद मनात असल्यास कोणतीच गोष्‍ट अशक्य नसुन असाध्य ते साध्य होऊ शकते, असे प्रतिपादन शरद घावटे यांनी पांढरी ग्रामस्थांतर्फे आयोजित केलेल्या सत्कार कार्यक्रमाला उत्तर देताना व्यक्त केले होते. यापुर्वी यश हे खुप जवळुन हुलकावणी देत होते. मात्र हार न मानता आपन पाठपुरावा करत गेलो. आपण सध्या निवड झालेल्या मंत्रालयातील कक्ष अधिकारी या पदावरच समाधान माणनारा नसुन भविष्यात उच्च ध्येय साध्य करून वेगळेपण दाखवण्‍याचा प्रयत्न आपण निश्‍चीतच करू असेही घावटे यांनी बोलताना सांगितले. पांढरी ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या सत्कार समारंभप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक मोहन घावटे, पांढरीचे सरपंच संतोष शिंदे, अच्युत घावटे, किरण घावटे, वन अधिकारी अजय घावटे, आबा घावटे, शाम शिकेतोड, लक्ष्मण घावटे, महेश घावटे, विष्णु घावटे यांच्यासह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. प्रगतशिल शेतकरी बापु घावटे यांचे ते पुतणे आहेत. मंत्रालयात कक्ष अधिकारी म्हणुन निवड झाल्याबदल त्यांचे पांगरी भागात अभिनंदन होत आहे.
 
Top