पांगरी (गणेश गोडसे) :- महिन्याभरापुर्वी बार्शी तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने तालुक्यातील द्राक्ष उत्पादकासह सर्वसामान्य शेतक-यांची उभी असलेली व हातातोंडाशी आलेली पिके उध्वस्त झाल्यामुळे त्यांना नुकसान भरपाई देण्याची प्रकियेला एक महिन्यापेक्षाही जास्त कालावधी उलटुन जावुनही कांही त्रुटींमुळे नुकसान ग्रस्तांना मदतीपासुन वंचित रहावे लागत असल्यामुळे प्रशासनाने तात्काळ त्रुटींची पुर्तता करून शेतक-यांना नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतक-यामधुन होत आहे.
अवकाळी पावसामुळे बार्शी तालुक्यातील शेतक-यांचे कंबरडेच मोडले होते. उठुन बसण्यासाठी थोडासा आधार म्हणुन ते शासनाच्या नुकसान भरपाईपोटी मिळणा-या तुटपुंज्या नुकसानीच्या अनुदानाकडे डोळे लावुन बसले होते. बार्शी तालुक्यात 26 फेब्रुवारी पासुन अवकाळी पावसाने सुरूवात केली होती. दि.10 मार्च पर्यंत पावसाळयाप्रमाणे अवकाळी पाऊस गारांसह दैनंदीन हजेरी लावुन शेतक-यांची पिके नेस्तनाबुत करण्यात गुंतला होता. बार्शी तालुक्यातील द्राक्ष, गहु, ज्वारी, हरभरा, दाळिंब, आंबा आदी पिकांचे गारपीठमुळे अतोनात नुकसान झाले होते. दि. 26 व 27 फेब्रुवारी दरम्यान झालेल्या पिकांच्या नुकसानींची पाहनी करून तसा अहवाल सादर करण्याचे आदेश शासनातर्फे कृषी खात्यास दिल्यानंतर व पंचनाम्याचे काम पुर्ण करण्यात आले होते. नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक महाराष्ट्रात येऊन त्यांचा अहवाल ही प्रशासनाला सादर झाला आहे. केंदिय पथकाचा अहवाल सादर झाल्यानंतरच नुकसानभरपाई तात्काळ शेतक-यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल अशी हुल नुकसानग्रस्त शेतक-यांना देण्यात आली होती. मात्र प्रशासनाकडुन प्रत्येकवेळी दोन-तिन दिवसात रक्कम खात्यावर जमा करण्यात येईल असे ठराविक व साचेबंदच उत्तर दिले जात आहे.
बार्शी तालुक्यात सलग तीन वर्ष भीषण दुष्काळ पडल्यामुळे शेतकरी अगोदरच रूपयालाही महाग झाला होता. प्रतिवर्षीच अवकाळी पाऊस अचानक येऊन शेतक-यांचे होत्याचे नव्हते करून टाकतो. झालेल्या अवकाळी पावसाने द्राक्ष बागायतदारांचे तर कंबरडेच मोडले असुन शेतक-यांनी केलेलेली ज्वारी, गहु आदी पिके काळी पडलेली आहेत. हरभरा पिकाची तर मशिनमधुन सरळ दाळच बाहेर येत आहे. पाण्यात भिजलेल्या पिकांचे दर तर निम्यावरच आले आहेत. ज्वारीच्या कडब्याची अवस्था तर खुपच भयावह आहे. कडबा बार्शीच्या बाजारपेठेत घेऊन गेल्यानंतर वाहनाचे भाडे खिशातुन भरण्याची वेळ सध्या शेतक-यांवर आहे.
राजकारण्यांनी मतपेठीसाठी जनतेला धिर देत नुकसानभरपाई मिळेल असा आशा दाखवत सांत्वन केले. शासनाच्या पथकाने बार्शी तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी करूण प्राथमिक नुकसानीच्या अंदाजासह पंचनाम्याचे अहवाल शासनाच्या वरिष्ठ विभागांना सुपुर्द केले आहेत. मात्र अहवाल सादर होऊन व राज्यस्तरीय नेत्यांनी लवकरच नुकसान भरपाई अनुदान देण्यात येईल असे आश्वासन देऊनही त्यांच्या घोषणा ह्या हवेतच विरत असल्यासारखे वाटत आहे. एवढे होऊनही नुकसानग्रस्त झालेल्या शेतक-यांना नुकसानभरपाई अद्यापही वितरीत करण्यात येत नसल्यामुळे शेतक-यांमधुन आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
बँक पासबुक झेरॉक्स जमा करण्याचे आदेश :-
अवकाळी पावसाच्या नुकसानभरपाईची प्रक्रिया वेगात सुरू असुन लाभार्थी शेतक-यांनी बँक खात्याची पासबुक झेरॉक्स संबंधीत गावच्या ग्रामपंचायत कार्यालयात अथवा संबंधीत प्रशासकीय कर्मचा-यांकडे जमा करावीत, असे आवाहन कृषी खात्यातर्फे करण्यात आले आहे. गावातील एका जरी शेतक-यांचा खाते नंबर कार्यालयास प्राप्त न झाल्यास संपुर्ण गावातील इतर लाभार्थी व गावे वेठीस धरली जाणार आहेत. पैसै जमा होताना आवक व जावकेत तफावत राहणार नाही, याची काळजी घेण्यासाठी प्रत्येक शेतक-यांचे बँक खाते नंबर गरजेचा रहाणार आहे. शेतक-यांनी त्यांचे बॅक खाते नंबर न दिल्यास प्रत्यक्ष शेतक-यांच्या खात्यावर रक्कम मिळण्यास साधारणः दोन ते तिन आठवडयाचा कालावधी लागु शकतो असे अधिका-यांनी सांगितले. अद्यापपर्यंत साधारणपणे 60 टक्केच शेतक-यांचे बॅक खाते क्रमांक प्राप्त झाले आहेत. मात्र जोपर्यंत शासनाकडुन शेतक-यांच्या पदरात कांही पडत नाही तोपर्यंत शेतकरी राजा मदतीची चातकाप्रमाणे वाट पहात बसणार.