बार्शी -: आम आदमी पार्टीचे उस्मानाबाद लोकसभा मधुन उभे असलेले विक्रम सावळे यांच्या प्रचारार्थ आम आदमी पार्टीच्या नेत्या मा. अंजलीताई दमानिया याची शनिवार दि. १२ एप्रिल २०१४ रोजी सकाळी ११ वाजता बार्शी येथील महात्मागांधी शॉपींग सेंटर जवळ, जाहीर सभा होणार आहे.
सभेला आम आदमी पार्टीच्या अंजलीताई दमानिया तसेच उस्मानाबाद मतदारसंघातून प्रा. अशोक सावळे, केरबा गाढवे गुरूजी, रणजीत सावळे, विद्याताई सावळे हे उपस्थित राहणार आहे. तरी बार्शीतील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सभेला उपस्थित रहावे. असे आवाहन आम आदमीच्या वतीने प्रचार प्रमुख मा. अनिल घंटे, ऍड. योगेश सावळे, यावेळी केले.