उस्मानाबाद :- येथील  जैन समाजाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे भगवान महावीर स्वामी यांचा २६१३ वा जन्मजयंती महामहोत्सव रविवार दि. १३ एप्रिल रोजी मोठया उत्साहात व विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात येणार आहे.
    भगवान महावीर स्वामींचा २६१३ व्या जन्मजयंती महामहोत्सवानिमित्त १२ एप्रिल २०१४ रोजी दुपारी ३ अंजना महिला मंडळाच्या वतीने वन मिनिट गेम, भाषण स्पर्धा, नृत्य स्पर्धा, बेस्ट कपाल, भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील कार्यक्रम सन्मती माताजी त्यागी भवन, झाडे गल्ली येथे होणार आहेत. तर १३ एप्रिल सकाळी ७.३० वा. माऊली येथील श्री १००८ पाश्र्वनाथ शैतवाळ दि. जैन मंदिरापासून भगवान महावीर जन्मयंजी निमित्त काढण्यात येणार आहे. शोभायात्रेचा शुभारंभ जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. स.१० वा. श्री १००८ पाश्र्वनाथ शैतवाळ दि. जैन मंदिर, माऊली चौक व श्री १००८ आदिनाथ दिंगबर जैन मंदिर, गुजर गल्ली येथे भ.महावीरांचा पंचामृत अभिषेक, पुजाआर्चा करण्यात येणार आहे. स.११.३० वा. मारवाडी गल्ली येथील जैन स्थानक येथे रक्तदान शिबीर व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
    दु.३.३० वा. मधुबन कुष्ठधाम व शिक्षण कॉलनी येथील मतिमंद मुलींच्या वस्तीगृहामध्ये मिष्ठान्न वाटप करण्यात येणार आहे. साय.६.३० वा. श्री १००८ पाश्र्वनाथ शैतवाळ दि. जैन मंदिर, माऊली चौक व श्री १००८ आदिनाथ दिंगबर जैन मंदिर, गुजर गल्ली येथे भ.महावीर जन्मकल्याणक महोत्सव (पाळणा) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
    तरी या सर्व कार्यक्रमाला शहरासह परिसरातील जैन श्रावक-श्राविकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन सकल जैन समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
 
Top