मंगळवेढा (समाधान फुगारे) :- वेडाच्या भरात पोटच्या मुलाने घरात झोपलेल्या जन्मदात्या वृद्ध बापाच्या डोक्यात कुर्हाडीचा घाव घालून जागेवरच ठार केले. तर वडीलांचा आपल्या हातून खुन झाल्याचा पश्चाताप झाल्याने क्षणात मुलाने राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार दि. ११ एप्रिल रोजी वाणी चिंचाळे (गडहिरेवस्ती) ता. सांगोला येथे घडली आहे. या खुन व आत्महत्यामुळे वाणी चिंचाळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मशिखान विष्णू गडहिरे (वय ६० रा.वाणीचिंचाळे8 असे ठार झालेल्या वडीलाचे नाव असून हणमंत मशिखान गडहिरे (वय २९ रा.वाणीचिंचाळे) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. वाणी चिंचाळे येथील मशिखान विष्णू गडहिरे हे आपल्या कुटूंबासमवेत गडहिरेवस्तीवर राहत असून त्यांना पत्नी व तीन मुले आहेत. तीन मुलांपैकी हणमंत वगळता भिमराव व सचीन या दोन्ही मुलांची लग्ने झाली आहेत. मात्र हणमंत हा सोलापूर येथे आय.टी.आयचे प्रशिक्षण घेत असल्यामुळे लग्न केले नव्हते. शिवाय हणमंत यास अधुनमधून वेड्याचे झटके येत असल्याने तो सोलापूर येथे मनोसोपचार घेत होता. त्याने आय.टी.आय.चे शिक्षण पूर्ण केले होते.
मात्र नोकरी मिळत नसल्यामुळे सध्या तो वडीलांप्रमाणे गवंडी काम करण्याचा व्यवसाय करीत होता. गेल्या काही दिवसापासून त्याला वडीलांनी आपलेही लग्न करावे असे वाटत होते. वडीलांनेही त्याच्याकरीता मुली पाहिल्या होत्या. अशातच आज शुक्रवारी वडील मशिखान शेजारच्या व्यक्तीची दुचाकी घेऊन बाहेरगावी गेले होते. यावेळी पत्नी गवत आणण्यासाठी शेतात तर दोन्ही मुले कामावर गेली होती. दुपारी काम आटोपून घरी आल्यानंतर १.३० वा.च्या सुमारास घरात झोपले होते. दरम्यान हणमंत याने अचानक वेड्याच्या भरात झोपलेल्या बेसावध वडीलाच्या डोक्यात कुर्हाडीचा प्रहार केला हा घाव इतका भीषण होता की वडील मशिखान जागीच ठार झाले. दरम्यान आपल्या हातून वडील ठार झाल्याचा पश्चाताप झाल्याने हणमंत याने क्षणाचा विलंब ही न लावता राहत्या घरातील पत्राच्या वाशाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी २.४५ वा.च्या सुमारस आपल्या दुचाकीची चावी मागण्यासाठी खरात नामक व्यक्तीने घरात डोकावले असता मशिखान गडहिरे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले तर हणमंत पत्राच्या अँगल लटकल्याचे चित्र पहावयास मिळाले. खरात यांनीच गावात माहिती दिल्यानंतर खून व आत्महत्याची घटना उघडकीस आली आहे.
हणमंत व मशिखान गडहिरे पिता पुत्र घरात मृत अवस्थेत पडल्याची माहिती गडहिरे कुटूंबीयांकडून तात्काळ पोलीसांना कळविण्यात आली. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर करांडे, पो.नि.दयानंद गावडे यंानी ताक्ताळ भेट देऊन पाहणी केली.