पांगरी (गणेश गोडसे) :- महाराष्ट्र शासन व आस्थापना विभागाने पोलीस कर्मचा-यांच्या दोन वर्षाला बदल्या करण्याच्या प्रकियेला संमती देऊन त्याची अंमलबजावणी करण्याच्या प्रकियेला सुरूवात केल्यामुळे या प्रकियेचा फटका बसणा-या घटकामधुन या निर्णयासंदर्भात उलटसुलट चर्चिले जाऊ लागले असुन दोन वर्षाला बदलीच्या आदेशात बदल होऊन कालावधी वाढवुन मिळेल, अशी आशा महाराष्ट्रातील पोलिस कर्मचारी बाळगुन आहेत.
    एकंदर बदली प्रकियेमुळे प्रतिवर्षी शासनाच्या तिजोरीवर कोटयावधी रूपयांचा बोजा पडणार असुन दोन वर्षाला पोलिस कर्मचा-यांच्या बदल्या ही प्रकिया नेमकी कोणाच्या सोर्इसाठी असाही एक मतप्रवाह निर्माण होऊ लागला आहे. पोलिस कर्मचा.यांच्या दोन वर्षात बदल्या करन्याच्या निर्णयामागे शासन प्रशासनाचा नेमका उदेश काय यावरही कर्मचा.यांधुन विचारमंधन होऊ लागले आहे. सहा वर्षांच्या कालावधीवरून तो दोन वर्षांवरच आणुन ठेवल्यामुळे या निर्णयाचा फायदा कितपत व कोणाला होणार हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे. सध्या मात्र राज्यातील पोलिस शिपार्इ, पोलिस नार्इक, पोलिस हवालदार व सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक यांच्यामधुन दोन वर्षात बदलीच्या शासनाच्या या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त होते.
   आस्थापना विभागाचे अप्पर पोलिस महानिरीक्षक यांच्या कार्यालयाकडुन नुकताच दि. 7 एप्रिलला सुधारीत अध्यादेश काढुन पोलिस कर्मचा-यांच्या बदल्याबाबत धोरण व मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. त्यानुसार पोलीस कर्मचा-यांची एका पोलीस ठाण्यात सहा वर्षांचा असलेला कालावधी कमी करून तो दोन वर्षांचा करण्याची तरतुद करण्यात आली आहे. त्या अध्यादेशानुसार प्रत्येक वर्षांसह दर दोन वर्षाला पोलीस कर्मचा-यांना आपल्या पिशव्या उचलुन पोलिस ठाणे सोडुन दुस-या पोलिस ठाण्यात जावे लागणार आहे. शासनाने पोलिसींगचा उदेश समोर ठेऊन हा निर्णय घेतला असला तरी राज्यातील पोलिस कर्मचा-यांवर या निर्णयाचा काय परिणाम होर्इल का याचा विचार मात्र शासनाने केलेला नसल्याचे उघड होत आहे. पोलीसांमधुन या निर्णयासंदर्भात असंतोष खदखदत असल्याचे समजते.
   दोन वर्षात बदली फायदाही व तोटाहीःशासनातर्फे दोन वर्षात बदली करन्यामागे पोलिस कर्मचा.यांचे त्या पोलिस ठाण्याच्या हदीत लागेबांधे तयार होऊ नयेत व पोलिसांनी फक्त कायदा आणि सुव्यवस्थेशीच बांधिल रहावे असा मुळ उदेश दोन वर्षांच्या बदली प्रकियेसंदर्भात आहे.दोन वर्षात बदली अटळ असल्यामुळे हितसंबंध  राजकारन्यांशी लागेबांधे पुढा.यांचे दबाव बघुन घेन्याची भाषा या सर्व बाबींपासुन पोलिसांची सुटका होणार असुन त्यांच्या कामातील पुढा.यांचा स्थानिक लोकप्रतिनिधी गुन्हेगारी प्रवृत्तींच्या लोकांचा हस्तक्षेप बहुतांशपणे कमी होण्यास यामुळे मदत होणार आहे.तसेच कर्मचा.यांना मनमोकळे व कोणाच्याही दबावाखाली न येता कामकाज करन्याची संधीही उपलब्ध होणार आहे.
     पोलिसांच्या दोन वर्षांत बदल्या होण्याच्या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाल्यास आधीच जास्तीच्या डयुटीमुळे तणावाखाली वावरत असलेल्या पोलिस कर्मचा-यांच्याही समस्यांमध्ये मोठी वाढ होऊन अनेक गोष्टींना त्यांना तोंड दयावे लागणार आहे. या निर्णयाचा पोलिस कर्मचा-यांच्या दैनंदिन व्यवहार व इतर घरगुती प्रश्‍नांवर काय परिणाम होणार आहे याचाही विचार होणे गरजेचे आहे. पोलिस कर्मचा-यांच्या शालेय शिक्षणाचा विषय असे अथवा त्यांच्या निवास, आर्इ-वडिलांच्या वृदधापकाळाच्या गरजा आदी बाबींचा विचार होणे गरजेचे आहे. शासनाने बदल्यासंदर्भात घेतलेल्या धोरणात्मक निर्णयाचा पोलिस कर्मचा-यांच्या जीवनावर कांही परिणाम होतो का या बाबींचा सकारात्मक विचार होणे गरजेचे आहे. या निर्णयाचा जिल्हा स्तरावर विचार केल्यास जिल्हयांची सीमा 120 कि.मी.अंतरापर्यंत असतात प्रत्येक दोन वर्षात बदली होऊन कर्मचा-यांना अनोळखी ठिकाणी आपल्या कुटूंबासह आपला लवाजमा घेऊन जावे लागणार आहे. "नेहमीची येतो पावसाळा" या म्हणीप्रमाणे दर दोन वर्षांला कर्मचा-यांना आपला बोजा बिस्तारा गुंडाळुन नवख्या ठिकाणी जावुन राहण्याच्या व्यवस्थेसह त्यांच्या पाल्यांच्या शालेय शिक्षणासाठी चांगल्या शिक्षण संस्थेचा शोध घ्यावा लागणार आहे. तसेच बदली झाल्यानंतर त्या कर्मचा-याला पुन्हा अनेक कि.मी. अंतरावर बंदोबस्ताच्या नावावर जावे लागते. दुस-यांच्या सुरक्षेच्या कारणावरून नवीन ठिकाणी त्यांना आपले कुटुंब रामभरोसे ठेऊन जावे लागते. शासनाने या निर्णयाचा फेरविचार करून एका पोलिस ठाण्यात किमान पाच वर्षांचा कालावधी तरी दयावा असे व कर्मचा-यांची भविष्यात होणारी गैरसोय दुर करावी असे कर्मचा-यांमधुन बोलले जात आहे.
 
Top