पांगरी (गणेश गोडसे) :- तात कनसासह उभी असलेली दोन एकर ज्वारी कोणीतरी अज्ञाताने पेटवुन दिल्यामुळे शेतकरी महिलेचे नुकसान झाल्याची घटना घोळवेवाडी (ता.बार्शी) येथील शिवारात घडली आहे.
    राधाबार्इ मोहन काळेल (वय 55 रा.ढेंबरेवाडी) असे शेतातील उभे पिक पेटवुन दिल्यामुळे नुकसान झालेल्या शेतकरी महिलेचे नांव आहे. नुकसानग्रस्त महिला राधाबार्इ काळेल यांनी पांगरी पोलिसात दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, त्यांची घोळवेवाडी शिवारात दोन एकर शेती असुन त्या शेतात ज्वारीचे पिक होते. आजारी असल्यामुळे त्या सोलापुर येथील त्यांच्या मुलाकडे गेल्या असता कोणीतरी अज्ञाताने त्यांच्या अनुपस्थितीचा गैरफायदा उचलत त्यांच्या शेतामधील कणसासह उभे असलेल्या ज्वारीच्या पिकास पेटवुन दिले. आगीत ज्वारी कणसासह पुर्णतः जळुन खाक झाली आहे. शेताजवळुनच रेल्वेलार्इन गेलेली असुन गँगमनने रेल्वेच्या हदीतील जागा पेटवुन दिल्यामुळे त्यांच्या शेतातील ज्वारी जळाली असल्याचे शेजारील शेतक-यांनी सांगितले असल्याचेही काळेल या शेतकरी महिलेने फिर्यादित म्हटले आहे. राधाबार्इ काळेल यांनी पांगरी पोलिसात दिलेल्या फिर्यादिवरून अज्ञाताविरूदध ज्वारी पेटवुन देऊन नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पांगरी पोलिस करत आहेत.
 
Top