
उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातील आघाडीचे उमेदवार डॉ. पद्मसिंह पाटील यांनी दि. 12 एप्रिल रोजी कळंब तालुक्यातील गोविंदपूर, देवधानोरा, भाट शिरपुरा आदी गावांना भेटी देऊन कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आणि सदर गावामध्ये प्रत्यक्ष मतदारांच्या भेटी देऊन आपले अमूल्य मत राष्ट्रवादीच्या घडाळालाच द्यावे, मतदार संघाच्या विकास कार्यात सहकार्य करण्याचे आवाहन उमेदवार डॉ. पाटील यांनी केले.
यावेळी राष्ट्रवादीचे कळंब तालुकाध्यक्ष रामहरी शिंदे, भारत खोसे, उत्तम टेकाळे, अशोक शिंदे, विजय चव्हाण, विकास गायकवाड, शिवराज गायकवाड, अतुल गायकवाड, किरण गायकवाड, प्रा. रामचंद्र खापे आदीजण उपस्थित होते.