भूम -: आघाडीचे उमेदवार डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ आमदार राहुल मोटे यांनी भूम तालुक्यातील हंगेवाडी, हुंबेवाडी, नळी, वडगाव, सुकरा या गावात घरोघरी भेटी दिल्या. यावेळी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी झटलेल्या डॉ. पद्मसिंह पाटील यांना भरघोस मतांनी विजयी करावे, असे आवाहन आ. मोटे यांनी केले.
ज्या पक्षाला कधी जनतेच्या प्रश्नासाठी वेळ नाही, ते लोक आज मतांचा जोगवा मागत आहेत, तरी विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. पद्मसिंह पाटील यांना निवडुन द्यावे, असे आवाहन घरोघरी भेटी देताना आ. मोटे यांनी केले आहे. घरोघरी भेटीगाठींना मतदार चांगला प्रतिसाद देत आहेत.
यावेळी सभापती आण्णा पाटील, तालुकाध्यक्ष हणमंत पाटुळे, प्रताप देशमुख यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या घरोघरी करण्यात येत असलेल्या प्रचारामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसला वातावरण चांगले असल्यामुळे भुम तालुक्यातील डॉ. पद्मसिंह पाटील यांना मताधिक्य मोठ्या प्रमाणात मिळेल, अशी आशा कार्यकर्त्यांतून वर्तविली जात आहे.