भूम -: उस्‍मानाबाद लोकसभा मतदार संघातील कॉंग्रेस-राष्‍ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ. पद्मसिंह पाटील यांना भूम-वाशी-परंडा तालुक्‍यातून मताधिक्‍य देण्‍यासाठी आ. राहुल मोटे व वैशाली मोटे यांनी हा मतदार संघ पिंजून काढला असून दोन्‍ही पक्षाचे कार्यकर्ते घरोघरी जावून प्रचार करीत आहेत.
    भूम तालुका पंचायत समितीचे सभापती अण्‍णा बोकील, तालुकाध्‍यक्ष हनुमंत पाटोळे, शिवाजीराव भोईटे, तात्‍यासाहेब गोरे यांच्‍यासह कार्यकर्ते भूम तालुक्‍यातील प्रत्‍येक गावी जावून मतदारांच्‍या भेटी घेत आहेत.
    खा.डॉ. पाटील यांनी जिल्‍ह्यात सिंचनाची कामे, पाझर तलाव, साठवण तलाव तसेच पंतप्रधान ग्रामसडक अंतर्गत जिल्‍ह्यात मोठ्या प्रमाणात रस्‍ते निर्माण केले आहेत. गेल्‍या पाच वर्षात खासदार निधीतून त्‍यांनी उस्‍मानाबाद लोकसभा मतदार संघात देखील मोठ्या प्रमाणात विकासाची कामे केली आहेत. सदर कार्यकर्ते डॉ. पाटील यांच्‍या कामाची माहिती, कोपर सभा, कार्यकर्त्‍यांच्‍या बैठका आणि प्रत्‍यक्ष मतदारांच्‍या भेटी घेऊन सांगत आहेत. भूम, परंडा व वाशी तिन्‍हीही तालुक्‍यामध्‍ये राष्‍ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने आघाडी घेतली असून डॉ. पाटील यांना अधिकाधिक मतांनी विजयी करण्‍याचे चंग या कार्यकर्त्‍यांनी बांधला आहे.
    या प्रचाराच्‍या रणधुमाळीमुळे तिन्‍ही तालुक्‍यात वातावरण सध्‍या राष्‍ट्रवादीमय झाल्‍याचे दिसत आहे.       
 
Top