उस्‍मानाबाद -: उस्‍मानाबाद लोकसभा मतदार संघातील आघाडीचे उमेदवार डॉ. पद्मसिंह पाटील यांना जिल्‍हा गुणवंत कामगार विकास संस्‍थेच्‍या जाहीर पाठींबा देण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला आहे. तसेच मध्‍यवर्ती गुणवंत कामगार संघटना, मुंबई यांनी देखील आघाडीच्‍या सर्व उमेदवारांना पाठिंबा देण्‍याचा निर्णय घेतला आहे.
    जिल्‍हा गुणवंत कामगार विकास संस्‍थेची नुकतीच बैठक घेण्‍यात आली. या बैठकीत डॉ. पाटील यांना जाहीर पाठींबा देण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला. उस्‍मानाबाद, तुळजापूर, उमरगा, कळंब, भूम, परंडा, बार्शी हे आगार तसेच याच तालुक्‍यातील काही गावांना भेट देवून संपर्क करण्‍यासाठी एस.टी. वर्कस इंटक युनियन उस्‍मानाबाद येथे संघटनेच्‍या आजी व माजी पदाधिकारी, सर्व गुणवंत कामगार एकत्र येऊन बैठकीत एकमताने पाठींबा जाहीर केला. यावेळी माजी विभागीय अध्‍यक्ष अंकुश पाटील, शाहुराज कावरे, उमरगा येथील मधुकर बिद्री, कळंब येथील रामभाऊ कवडे, एस.जी. निपाणीकर, भूम येथील बी.डी. गपाट, परंडा डी.डी. नलवडे उपस्थित होते. अशी माहिती जिल्‍हा गुणवंत कामगार विकास संस्‍थेचे अध्‍यक्ष अच्‍युतराव माने पाटील यांनी प्रसिध्‍दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
 
Top