कळंब -: उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातील आघाडीचे उमेदवार डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवारे यांचे पुत्र तथा डॉ. पाटील यांचे भाच्चे पार्थ पवार यांनी शनिवार दि. 12 एप्रिल रोजी कळंब शहरामध्ये पदयात्रा काढली. पार्थ पवार यांच्यासोबत आ. राणाजगजितसिंह पाटील यांचे चिरंजीव मल्हार पाटील हे उपस्थित होते.
कळंब शहरातील ढोकी रोडवरील राष्ट्रवादीच्या प्रचार कार्यालयापासून या भव्य पदयात्रेस सुरुवात झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याल पार्थ व मल्हार यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी युवकांना मार्गदर्शन करताना पार्थ पवार म्हणालके की, युवकांकडेच खरे नेतृत्व करण्याची ताकद असून मतदान ही सगळ्यात मोठी आपली शक्ती आहे. आपल्या एक मताला देशाच्या राजकारणाला खुप मोठी ताकद मिळते, म्हणून मतदार संघाच्या विकासासाठी आघाडीचे उमेदवार डॉ. पद्मसिंह पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन पार्थ यांनी यावेळी युवकांना केले.
या पदयात्रेत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रवीण यादव, शहराध्यक्ष्ज्ञ शिवाजी कराळे, तालुकाध्यक्ष अरुण चौधरी, तारेक मिर्झा, प्रशांत लोमटे, शितल चोंदे, राहुल हौलसमल यांच्यासह आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.