बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : भगवंत देवस्थान ट्रस्ट आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने भगवंत प्रकटोत्सव दिनानिमित्त प्रवचन, भारुड, व्याख्यान व किर्तन महोत्सवाचा सप्ताह आयोजित करण्यात आल्याची माहिती सरपंच दादा बुडूख यांनी दिली.
    या सप्ताहाची सुरुवात रविवारी दि.४ पासून होत आहे. इचलकरंजी येथील अशोक दास यांचे शामची आई आणि शांती ब्रह्म या विषयावर, पंढरपूर येथील तुकाराम मस्के यांचे सावधान, सज्जनांची नाव बुडत आहे या विषयावर, मिलींद जोशी यांचे योगी अरविंद चरित्र व तत्वज्ञान या विषयावर, नांदेड येथील रमाकांत चाटी यांचे भक्तीगीत या विषयावर, अमरावती येथील पद्माकर देशमुख यांचे भक्तीची सुलभता, जयवंत बोधले महाराज यांचे पसायदान मानसशास्त्रीय विषयावर विश्‍लेषण हे कार्यक्रम दररोज सायंकाळी ६ ते ७ : ३० या वेळेत आयोजित केले आहेत. किर्तनाच्या कार्यक्रमात दररोज रात्रौ ९ ते ११ पर्यंत संत तुकाराम महाराज, संत नरहरि सोनार, संत लाखा कोलाटी, संत चोखामेळा महाराजांच्या अभंगावर आधारित सौ.स्मिताताई आजेगांवकर, डोंबीवली, भक्त व भक्ती विषयावर सौरभ मोरे साकतकर, संध्याताई तिवाडी पंढरपूर यांचे भारुड, नामस्मरण विषयी डॉ.कालिदास लिमकर यांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी दि.११ मे २०१४ रोजी पहाटे ४:३० ते ६ पर्यंत श्री.भगवंत प्रकटोत्सवानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रोटरीचे अशोक हेड्डा, हंसराज झंवर, डॉ.भरत गायकवाड, तेजस वखारिया, देवस्थान ट्रस्टचे द.ग.कश्यपी, विजयकिशोर सोमाणी, मुकूंद कुलकर्णी, डॉ.बी.वाय.यादव आदी परिश्रम घेत आहेत.
 
Top