उस्मानाबाद :- उस्मानाबाद शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते शिंगोली सर्कीट हाऊसपर्यंत उपरोक्त कलमान्वये धरणे, उपोषण, ध्वनीक्षेपकाचा वापर,मोर्चा इत्यादी आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्यास प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. उप विभागीय दंडाधिकारी प्रशांत सुर्यवंशी यांनी  फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अंतर्गत हे आदेश जारी केले असून 30 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून ते 1 मे,2014 च्या  मध्यरात्रीपर्यंत आदेश लागू राहतील. 
      जिल्हाधिकारी कार्यालय तसेच पोलीस संचलन मैदान येथे होणा-या ध्वजारोहण कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर हे आदेश जारी करण्यात आले आहेत.
 
Top