उस्मानाबाद -: जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण हे जिल्हा दौ-यावर येत असून  त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
     बुधवार, दि.30 एप्रिल रोजी सकाळी 7-05 वाजता सोलापूर येथून शासकीय वाहनाने अणदूर ता.तुळजापूर कडे प्रयाण. स. 8 वा. अणदूर येथे आगमन व राखीव. दुपारी 1-30 वा. शासकीय विश्रामगृह, उस्मानाबाद येथे आगमन, राखीव व मुक्काम.
      गुरुवार, दि. 1 मे रोजी स. 7-45 वा. शिंगोली  सर्किट हाऊस, उस्मानाबाद येथून पोलीस मुख्यालयाकडे प्रयाण. स. 8 वा. महाराष्ट्र राज्य वर्धापन दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभास उपस्थिती.  (स्थळ- पोलीस मुख्यालय प्रांगण), उस्मानाबाद. स. 9-30 वा. उस्मानाबाद येथून शासकीय विश्रामगृह, तुळजापूरकडे प्रयाण.
 
Top