नळदुर्ग -: किलज (ता. तुळजापूर) येथे वादळी वा-यासह झालेल्‍या जोरदार पावसात वीज पडून एक म्‍हैस जागीच ठार झाली तर परिसरातील अनेक घरावरील पत्रे उडून गेले. ही घटना मंगळवार रोजी दुपारी साडे चार वाजण्‍याच्‍या सुमारास घडली.
    किलज (ता. तुळजापूर) येथील श्रीकांत माळाप्‍पा तिदाडे या शेतक-याची किलज येथे शेती असून  त्‍यांनी त्‍यांच्‍या शेतात म्‍हैस बांधली होती. दरम्‍यान दुपारी साडे चार वाजण्‍याच्‍या सुमारास अचानक जोरदार मेघगर्जना होऊन पावसास सुरुवात झाली. यावेळी वीज पडून तिदाडे या शेतक-ज्‍याची म्‍हैस जागीच ठार झाली. या म्‍हैशाची किंमत 50 हजार रुपये असल्‍याचा प्राथमिक अंदाज आहे. ही घटना समजताच तलाठी काळे यांनी पंचनामा केला. यावेळी किलजचे सरपंच राजेंद्र राठोड हे उपस्थित होते. दरम्‍यान, किलज परिसरात वादळी वा-यामुळे अनेकांच्‍या घरावरील पत्रे उडाले आहेत.
 
Top