उस्मानाबाद :- येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्ग (मुलांचे) शासकीय वसतिगृहात सन 2014-2015 या शैक्षणिक वर्षाकरीता विद्यालय व महाविद्यालयीन  विद्यार्थ्याना प्रवेश अर्ज  1 मे 2014 पासून विनामुल्य देण्यात येणार आहे.
    वसतीगृहात प्रवेश घेवू इच्छिणा-यांनी वसतिगृह कार्यालयाशी संपर्क साधून प्रवेश अर्ज घेवून जावीत,असे आवाहन प्रभारी गृहपाल  रविंद्र वाघमारे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मा.व (मुलांचे) शासकीय वसतीगृह, उस्मानाबाद यांनी एका पत्रकान्वये केले आहे.
      तसेच शालेय विभागातील विद्यार्थ्यांनी दि. 15 मे 2014 पुर्वी किंवा निकाल लागल्यापासून 15 दिवसाच्या आत  व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी निकाल लागल्यापासून 15 दिवसाच्या आत प्रवेश अर्ज घेवून परिपुर्ण अर्ज सादर करावेत.
प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहात निवास/ भोजनाची विनामुल्य व्यवस्था केली जाणार आहे. तसेच शैक्षणिक साहित्यासाठी रकक्म, अंथरुण-पांघरुण आदि साहित्य मोफत पुरविले जाणार आहे. शिवाय  निर्वाह भत्ता दरमहा 600/- रुपये दिले जाणार आहे.
    गरजु विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी वसतिगृहाच्या अधीक्षकांशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधुन प्रवेश अर्ज प्राप्त करुन घ्यावे, असेही कळविण्यात आले आहे.
 
Top