कळंब -: येरमाळा (ता. कळंब) येथील येडेश्वरी यात्रेत एक अनेाळखी बेवारस पुरुष जातीचे प्रेत आढळून आले त्याचे  वय अंदाजे 30 वर्ष, उंची 5 फुट 6 इंच, रंग-गोरा, बांधा-सडपातळ, दाढी वाढलेली डोक्याचे केस काळे व वाढलेले, नाक-सरळ, चेहरा-अरुंद, अंगावर काळपट रंगाची पॅन्ट, उजव्या हाताच्या पोटरीवर मराठीत नूर व इंग्रजीत सी. बी. असे गोंदलेले आहे. अशा  वर्णनाचा बेवारस इसम मृत्त आढळून  आल्याने  त्याची आकस्मात मृत्युची नोंद  करण्यात आली आहे.
सदर इसमाबाबत कोणास काही माहिती असल्यास त्यांनी  पोलीस स्टेशन, येरमाळा, ता. कळंब, जि. उस्मानाबाद दुरध्वनी क्रमांक(02473-266170),सहायक पोलीस निरीक्षक एस. एस. चव्हाण (9823239333),  पोलीस हेड कॉन्स्टटेबल/384 एस. ए. ढाकणे( 9403397077) पोलीस स्टेशन, येरमाळा  यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
 
Top