पांगरी (गणेश गोडसे) :- माहेरहुन दोन लाख रूपये घेऊन येण्याच्या कारणावरून विवाहितेला शारीरिक मानसिक त्रास करून जाचहाट केल्याची घटना मळेगांव (ता. बार्शी) येथे घडली असुन पिडीत महिला किर्ती नागेश मोरे यांनी दिलेल्या फिर्यादिवरून पांगरी पोलिसात पती नागेश मोरे यांच्यावर जाचहाट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिडीत किर्ती मोरे यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, त्यांचे पती नागेश यांनी त्यांना माहेरहुन दोन लाख रूपये घेऊन येण्याच्या कारणावरूण उपाशीपोटी ठेवत लाथा बुक्यांनी मारहाण करत शारीरीक व मानसिक छळ केला. पांगरी पोलिसात नागेश मोरे यांच्याविरूदध जाचहाट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास पांगरी पोलिस करत आहेत.