पांगरी (गणेश गोडसे) : शेतातील विहीरीवर जाण्याच्या रस्त्याच्या किरकोळ कारणावरूण तिघांनी मिळुन एका महिलेला शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केल्याची घटना उक्कडगांव (ता. बार्शी) येथील शिवारात घडली.
वत्सला श्रीरंग मुळे (रा. उक्कडगांव) असे मारहानीत जखमी झालेल्या महिलेचे नांव असुन अनिता विलास मुळे, मधुकर गणपती मुळे व विलास मधुकर मुळे अशी मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नांवे आहेत.
वत्सला मुळे या महिलेने पोलिसात दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, आरोपींनी मिळुन शेतातील विहीरीवर जाण्याच्या रस्त्याच्या कारणावरूण त्यांना शिवीगाळ, दमदाटी करत लाथाबुक्यांनी मारहान केली. पांगरी पोलिसात तिघांविरूध्द मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पांगरी पोलिस करत आहेत.