पांगरी (गणेश गोडसे) :- शेतजमीन नावावर करण्‍याच्या व शेतात येण्‍याजाण्‍याच्या कारणावरून चौघांनी मिळुन एकाला शिविगाळ दमदाटी करत मारहान केल्याची घटना उक्कडगांव (ता. बार्शी) येथे घडली.
    भारत खंडु दराडे (वय 63, रा. उक्कडगांव) असे मारहानीत जखमी झालेल्या सेवानिवृत्त नायब तहसिलदारांचे नांव आहे. भास्कर काशिनाथ डोळे, दिवाकर भारत दराडे, भैय्या भास्कर डोळे व रेखा दिवाकर डोळे (सर्व रा.भालगांव, ता.बार्शी) अशी मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नांवे आहेत.
  भारत दराडे यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, आरोपींनी संगनमत करूण उक्कडगांव येथील घरी येऊन तु शेतजमीनीत का येतो, पिक का घेऊन जातो असे म्हणत शेतजमीन आमच्या नावावर का करून देत नाहीत, असे म्हणत त्यांना शिविगाळ दमदाटी करत मारहाण केली. पांगरी पोलिसात चौघांवर मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे. अधिक तपास पांगरी पोलिस करत आहेत.
 
Top