पांगरी (गणेश गोडसे)  :- पांगरी (ता. बार्शी) येथे प्रतिवर्षीप्रमाणेच यावर्षीही रामजन्मोत्सवाचा ऊत्सव मोठया आनंदी वातावरणात व पारंपारिक पध्‍दतीने साजरा करण्‍यात आला. आज मंगळवारी सकाळी श्रीरामपेठ भागातील राम मंदिरापासुन सवाद्य पालखी मिरवणुक काढण्‍यात आली. पालखीची संपुर्ण पांगरी गावातुन वाजतगाजत मिरवणुक काढुन पालखी दुपारी पुन्हा राममंदिरात आणण्‍यात आली. फुले उधळुन रामनवमी साजरी करण्‍यात आली.
     पालखीसमवेत असलेल्या बैलगाडयांच्या ताफ्यात प्रभु राम, रावण, शंकर, जमुना, जोकर आदींचा वेश परिधान केलेले सोंगाडे असल्यामुळे हे आजच्या पालखी मिरवणुकीचे वेगळेपण होते. सकाळी आठ वाजता निघालेल्या पालखी मिरवणुकीत बहुसंख्य ग्रा व भाविक उपस्थित होते.मस्‍थ श्रीरामपेठ भागात झालेल्या रामजन्मोत्सवाच्या कार्यक्रमाला पांगरीसह पांढरी, चिंचोली, ढेंबरेवाडी, उक्कडगांव आदी गावांमधील भाविकांनी हजेरी लावली होती. पांगरी भागात फक्त पांगरीतच राममंदिर असल्यामुळे भाविक या दिवशी पांगरीतील राम मंदिरात आवर्जुन हजेरी लावुन कार्यक्रमात सहभागी होतात. श्रीरामजन्मोत्सवाचा कार्यक्रम पार पाडसाठी श्रीराम मित्रमंडळासह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
 
Top