लातूर : ‘‘२१ व्या शतकात पाऊल टाकताना आपण आपल्या भारतीय संस्कृतीचे जतन व संवर्धन केले पाहिजे.’’ असे उदगार नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु व थोर शिक्षणतज्ञ, थोर शास्त्रज्ञ व विचारवंत डॉ. पंडित बी. विद्यासागर यांनी काढले.
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे व रामेश्वर रुई ग्रामस्थानच्यावतीने प्रभू श्री रामचंद्र जन्मसोहळ्याच्या निमित्ताने सर्वधर्म समभावाचे भारतीय संस्कृतीदर्शन-श्री रामरथयात्रा रामेश्वर रुई येथे आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.नवी दिल्ली येथील अखिल भारतीय सांस्कृतिक परिषदेचे उपाध्यक्ष व नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. एस.एन.पठाण हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या रथयात्रेमध्ये रामेश्वरच्या पंचक्रोशीतील हजारो लोक सहभागी झाले होते. विशेष म्हणजे या रथयात्रेमध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता. यावेळी विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, श्री. कमाल पटेल, ह.भ.प. श्री. विश्वनाथबुवा नागझरीकर महाराज, ह.भ.प.श्री. नारायणमहाराज उत्तरेश्वर पिंप्रिकर, ह.भ.प. डॉ. सुदाम महाराज पानेगावकर व लातूरच्या एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाचे कार्यकारी संचालक श्री. रमेशअप्पा कराड हे उपस्थित होते. तसेच श्री.तुळशीराम दा. कराड, प्रगतीशील शेतकरी श्री. काशीराम दा. कराड, माईर्स एमआयटीचे कार्यकारी संचालक प्रा. डॉ. मंगेश तु. कराड,माईर्स आयटी शिक्षण समूहाचे कार्यकारी संचालक प्रा. राहुल विश्वनाथ कराडव डॉ. सुचित्रा कराड-नागरे हेही उपस्थित होते.
डॉ.पंडित बी. विद्यासागर म्हणाले, ‘‘विज्ञानाची विक्रमी घोडदौड चालू आहे. आपण सर्वजण भौतिक सुखाच्या मागे लागलो आहोत. पण आपल्याला खरे सुख मिळवावयाचे असेल, तर आपल्या संस्कृतीची पाळेमुळे शोधली पाहिजेत. विज्ञानाचे ओवीमध्ये रुपांतर करताना शब्दात सामर्थ्य असले पाहिजे पण त्याचबरोबर संतांचा साधेपणा घेतला पाहिजे. तरच आपला समतोल विकास होईल.’’
डॉ.एस.एन.पठाण म्हणाले, ‘‘समाजातील अनेक माणसांनी वेगवेगळ्या रंगाच्या पताका खांद्यावर घेतल्या आहेत. पण या सर्वांचे मिळून इंद्रधनुष्य तयार होते. त्याचप्रमाणे ही मानव जात पुढे जात आहे. पांढर्या रंगाच्या पताकेमध्ये प्रेमाचे प्रतिक आहे. आणि भारत देशाला त्याचे महत्त्व कळले आहे. माऊली ज्ञानेश्वरांची पालखी म्हणजे समाजातील सर्व लोकांची मिळून झालेली गंगा आहे.’’
प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, ‘‘आज आमच्या मनात एक कृतार्थतेची भावना आहे. कारण आज ही रथयात्रा संपूर्ण रामेश्वर गावाच्या पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्थांनी एकत्रित येवून, तसेच, या जन्मसोहळयात व रथयात्रेत सहभागी होवून केवळ लातूर जिल्ह्यालाच नव्हे तर सर्व समाजालाच एक नवा मार्ग दाखविला आहे. राममंदिर व मस्जिद यांची एकाच वेळी उभारणी झाली. आता रथयात्रा होवून एक परंपरा चालत आली आहे. ती अशीच अबाधित व अखंडितपणे चालत राहून समाजाला एका वेगळया दिशेने नेईल. राम हा केवळ हिंदू धर्माचा आहे म्हणून आम्ही त्याला मानतो असे नाही तर जगातली अतिप्राचीन अशी जी भारतीय परंपरा आहे, तीचा तो नायक आहे म्हणून सर्व जगाने त्याचे अनुकरण करावे. मग जगात कोणत्याही प्रकारची अशांती किंवा संघर्ष उरणार नाही. सर्वत्र शांतीचे रामराज्य पसरेल.’’ असेही डॉ. कराड यांनी शेवटी सांगितले.