सुरज शिंदे
पांगरी (गणेश गोडसे) :- चिंचोली (ता. बार्शी) येथील सुरज नानासाहेब शिंदे यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागात सहाय्यक अभियंता म्हणुन निवड झाली आहे.
    2013 मध्ये झालेल्या महाराष्ट्र अभियांत्रीकी सेवा परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्यानंतर त्यांची निवड झाली आहे. सुरज शिंदे यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कोसुंब (ता. संगमेश्‍वर) येथे तर उच्च शिक्षण विद्या प्रतिष्ठान बारामती येथे झाले. सुरज शिंदे हे सध्या कोल्हापुर येथे विक्रीकर अधिकारी म्हणुन कार्यरत आहेत. त्यांचे वडिल नानासाहेब शिंदे हे मुख्याध्यापक पदावर तर आई शिक्षीका म्हणुन कार्यरत आहेत. महाराष्ट्र जिवन प्राधिकरण विभागात निवड झाल्याबदल सुरज शिंदे यांचे मुंबईचे पोलिस उपायुक्त दत्ता शिंदे, चिंचोलीचे तंटामुक्त अध्यक्ष किरण पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर शिंदे यांच्यासह इतरांकडुन अभिनंदन होत आहे.
 
Top