पांगरी (गणेश गोडसे) :- सोळाव्या लोकसभा निवडणुकीची मतदान प्रकिया दहा दिवसांवर येऊनही बार्शी तालुक्यात निवडणुकीत कसलाच रंग भरलेला नसुन बार्शीत एखादी मोठया नेत्यांची सभा झाल्याशिवाय प्रचारायंत्रणेत रंगत निर्माण होणार नसुन सदयस्थितीत मात्र सर्वच पक्षांच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी बार्शी तालुक्याला फारसे गांभिर्याने घेतल्याचे दिसत नाही.
    उस्मानाबाद मतदारसंघात अकरा उमेदवार अधिकृत पक्षांकडुन तर सोळा उमेदवार हे अपक्ष म्हणुन आपले नशिब आजमावत आहेत. अनेकजण आपणच दिल्ली गाठणार अशा वल्गना करू लागले आहेत. मात्र मतदानासाठी अवघे दहा दिवस शिल्लक राहीलेले असतानाही ग्रामीण भागातील कार्यकर्ते मात्र जणू निवडणुक वगैरे कांहीच नसल्यासारखेच वागताना दिसुन येत आहेत. वरिष्ठांकडुन आलेल्या आदेशान्वये फक्त तालुकास्तरावर होणा-या महत्वाच्या बैठकांना हजेरी लावण्‍यापलीकडे कोणत्याच पक्षाचा कार्यकर्ता कांही करताना दिसुन येत नाही. एकंदर या निवडणुकीत बार्शी तालुक्यातील मतदार हा उदासिनच असल्याचे निदर्शनास येत आहे. गावोगावचे कार्यकर्त्यांना निवडणुका अगदी जवळ येऊनही अजुन त्यांना कोणत्याच पक्षाने रसद पोच केली नसल्यामुळे अजुनही ते वेट ऍन्ड वॉचच्याच भुमिकेत असल्याचे पहावयास मिळत आहे. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात बार्शी तिकडे सरसी अशीच कांहीशी अवस्था असल्यामुळे प्रत्येक उमेदवाराची भिस्त ही बार्शीवरच असते मात्र या निवडणुकीत उमेदवारांनी बार्शीकडे कानाडोळा करत मतदारसंघातील इतर तालुक्यात चांगलीच प्रचारयंत्रणा राबवली असल्याचे दिसत आहे.
    कांही पक्षांचे कार्यकर्ते आधुनिक प्रचार साहित्यांचा वापर बार्शी तालुका वगळता इतरत्र मोठया प्रमाणात सूरू असला तरी कार्यकर्त्यांची प्रचार यंत्रणा मात्र म्हणावी अशी अजुन तरी कार्यरत झालेली नसल्याचे पहावयास मिळत आहे. लोकसभा निवडणुकीत सर्वच उमेदवारांना ही निवडणुक जिकीरीची वाटत आहे. मतदार चानाक्ष व हुशार असल्यामुळे उमेदवारांप्रमाणेच त्यांच्याही आकांक्षेत खुप मोठी वाढ झालेली असुन अपेक्षापुर्तीनंतरच प्रचार यंत्रणेत हाटायचं अस प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते उघड बोलताना दिसत आहेत.
   तीन जिल्हे, अकरा तालुके, एक हजार गावांचा व सतरा लाख मतदारांचा उस्मानाबाद मतदारसंघात समावेश आहे. एकंदर सध्यातरी उस्मानाबाद मतदारसंघात बार्शी तालुक्यात निवडणुकीच्या दृष्टीने कांहीच म्हणावे असे वातावरण तयार झालेले नाही. बार्शी तालुक्यातील कांही भागात अपवादात्मक पक्षांनी प्रचार सभा घेऊन वातावरण निर्मिती करण्‍याचा प्रयत्न केला आहे. कांही नेत्यांनी आपली भुमिका गुलदस्त्यात ठेवलेली असल्यामुळे कोणता नेता कोणाच्या पाठीमागे ही गो पडदयाआड राहील्यामुळे कार्यकर्तेही अंधारात आहेत. त्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात असल्याचे पहावयास मिळत आहे. नेते मंडळी आपली स्पष्‍ट भुमिका मांडस तयार नाहीत.ण्‍या मतदारसंघातील बार्शी तालुक्याच्या शेजारील तालुक्यात राज्यस्तरीय नेत्यांच्या सभांचा धुमधडाका सुरू असताना बार्शी तालुक्यात मात्र अजुन एकाही राज्यस्तरीय नेत्यांच्या उपस्थितीत सभा झालेली नाही. उस्मानाबाद मतदारसंघात उस्मानाबादसह बार्शी, भुम, परांडा, वाशी, कळंब, औसा, लोहारा, उमरगा, तुळजापुर असा विस्तीर्ण भागांचा समावेश आहे. बार्शी तालुक्यातील मतदार कोणाला साथ देणार व कोणाला ठेंगा दाखवणार यावर उस्मानाबाद मतदारसंघातील उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. सध्यातरी सर्वच पक्षांनी बार्शी तालुका आपलाच असे म्हणत तालुक्यातील मतदारांकडे दुर्लक्ष करून ठेंगा दाखवण्‍याचे धाडस केले आहे.
    निवडणकीत मात्र अजुनही रंग भरन्यास सुरूवात झाली नाही. गावोगावचे स्थानिक नेते प्रचार यंत्रणेत सहभागी न होताही आपल्या आपल्या गॉडफादरना काम जोमात सुरू असुन आपल्यालाच मताधिक्य मिळणार असे आणाभाका घेऊन सांगत आहेत व तेवढे पोच करायची व्यवस्था करावी असे मात्र सांगताना दिसत आहेत. गॉडफादर नेत्यांनाही हे कांही नविन नसल्यामुळे तेही त्याच पध्‍दधतीने त्यांना उत्तर देत आहेत. मागील सर्वच निवडणुकांचा अनुभवावरून व होणारी लोकसभा ही अटीतटीची असल्यामुळे मतदारांच्या तोंडाला पाणी सुटलेले आहे.चानाक्ष राजकारणी मात्र अजुन कांही काळ त्यांना तसेच ठेवन्यात धन्यता मानत आहते.
   निवडणुक म्हटलं की, भरधाव व कर्णकर्कश आवाजात फिरणारी वाहने. एका पक्षाची प्रचाराची गाडी फिरून गेली की त्याच भागात दुस-या विरोधी पक्षांची गाडी प्रचारासाठी हजर असे चित्र यापुर्वी पहावयास मिळत होते. मात्र सध्या असे कुठेच निदर्शनास येत नाही.
 
Top