बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : रामनवमीचा सण असतांनाही धष्टपुष्ट जनावरे कत्तलखान्यात जात असतांना पाहून क्रिकेटचा सराव करणार्या मॉर्निंग क्रिकेट क्लब मधील तरुणांनी जनावरे पकडून पोलिसांच्या ताब्यात दिली.
मंगळवारी सकाळी आठ ते नऊच्या दरम्यान सदरचा प्रकार घडला. क्रिकेट खेळण्यासाठी असलेल्या मैदानाजवळ कत्तलखान्याच्या जवळचा परिसर आहे. रामनवमीचा सण असल्याने आज कशी काय कत्तल अशी शंका मनात असल्याने जनावरे घेऊन चाललेल्या व्यक्तीला क्रिकेट खेळाडूंनी जनावरे कुठे घेऊन चालला असे विचारले. यावेळी ही जनावरे वालवड येथून आणली आहेत व आम्ही कत्तलखान्यात घेऊन चाललो असल्याचे उत्तर देण्यात आले. यावेळी सदरचा प्रकार थांबविण्यासाठी शाब्दीक चकमक सुरु झाली. यावेळी आज तुम्हाला जनावरांची कत्तल करता येणार नाही व तुम्हाला पोलिसांकडे घेऊन जाऊ असे काहींनी सांगीतल्यावर कत्तलखान्याकडील फारुख कुरेशी यांनी मोठा जमाव जमविला. जनावरांची अडवून चौकशी करणारे तुम्ही कोण आम्ही किती कत्तल करायची ते करु आम्हाला पोलिस देखिल विचारत नाहीत आमचे त्यांचे संबंध आहेत इथून निघा नाहीतर आम्ही तुम्हाला मारु अशी धमकी जमावातील काही जणांनी दिली.
सदरच्या प्रकाराची माहिती मिळाल्यावर गावातील इतर लोक त्या ठिकाणी निघाले. भगवंत मंदिर परिसरापर्यंत जनावरे आणल्यानंतर हिंदू-मुस्लिम समाजाच्या मोठ्या जमावाची गर्दी व शाब्दीक चकमक सुरु झाली. सदरच्या घटनेची माहिती मिळाल्यावर बार्शी पोलिसांची एक तुकडी त्या ठिकाणी हजर झाली व पोलिस ठाण्याकडे सर्व जनावरे व तक्रारदार तसेच जनावरे घेऊन जाणारे, जनावरांचा हक्क सांगणारे कुरेशी यांना घेऊन पोलिस ठाण्याकडे आणले. यावेळी प्राणीमित्र धन्यकुमार पटवा यांनी पोलिस ठाण्यात येऊन जनावरे पाहिली. पोलिसांनी पशू वैद्यकिय अधिकारी बिरादार यांना मोबाईलवर विचारणा केली असता आम्ही काल पासून कोणत्याही जनावरांना कत्तल करण्याचा परवाना दिला नाही. आज मी लातूरमध्ये आहे असे सांगीतले. जनावरे पोलिस ठाण्यात आणल्यानंतर पोलिस ठाण्याच्या परिसरात हिंदू - मुस्लिम समाजाच्या मोठ्या गर्दीने काही काळ वातावरणात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी सदरच्या जनावरांची चौकशी करु तोपर्यंत नगरपालिकेच्या कोंडवाडा येथे जनावरे पाठविण्यात येतील व नंतर चौकशी करुन योग्य ती कारवाई करु असे आश्वासन दिले. यापूर्वीच्या घटनेत पटवा यांनी चांगल्या स्थितीतील दोन गायी व चौदा बैल यांची कत्तल होत असल्याचे तसेच चांगल्या स्थितीतील जनावरांना रोगट जनावरे असल्याचे डॉ.बिराजदार यांनी खोटे दाखले दिले असल्याची तक्रार दिली होती. पोलिस, नगरपालिकेचे पशू वैद्यकिय अधिकारी, यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार दिली व त्यानंतर न्यायालयात धाव घेतली त्याच्या निकालानंतर अपिल व नंतर उच्च न्यायालयात धाव घेऊन मुंबई उच्चन्यायालयाकडून जनावरे गोरक्षणला द्यावी असा निर्णय दिला आहे. सदरच्या न्यायालयाच्या निकालाच्या घटनेला एक आठवडा देखिल उलटला नाही तोवर हा दुसरा प्रकार समोर आला आहे. सदरच्या प्रकारामुळे बार्शी शहरातील जनावरांच्या होत असलेल्या बेकायदा कत्तलचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे.