बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : पानगाव (ता.बार्शी) येथे आघाडीचे उमेदवार डॉ.पद्मसिंह पाटील यांच्या प्रचाराच्या वाहनाने दुचाकी वाहनास धडक दिली. सदरच्या अपघातात दोघे जखमी तर चार ते पाच वर्षांच्या लहान मुलीचा मृत्यू झाला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अधिक माहिती अशी, पानगाव येथे प्रचारासाठी आलेल्या वाहनातील चालक इतर व्यक्ती मद्यप्राशन करुन मोठ्या आवाजात स्पिकरवर गोंगाट करुन राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ.पद्मसिंह पाटील यांचा प्रचार करत होते. सदरच्या वाहनाने गावातील सर्व गल्ल्यांतून वाहन क्रमांक एम.एच.१३-एन-२३८८ हे महिंद्रा कंपनीचे सवेरा वाहन नेत असतांना चांगलाच धुमाकुळ घातला. मधूनच भरधाव वेगाने वाहन चालवत होते. यावेळी मोटरसायकल याचा तात्पुरता क्रमांक एम.एच.१३-टीसी-३०१ या दुचाकी वाहनावरुन युवराज हनुमंत काळे (वय २६) हे बहिणीच्या मुली सायली दादासाहेब भोसले (वय ३) व शिवानी दादासाहेब भोसले (वय ४) दोघी रा.कुंभेज ता.करमाळा यांना घेऊन जात असतांना धडक दिली. सदरच्या अपघातात शिवानी भोसले या मुलीचा मृत्यू झाला. सदरचा प्रकार हा दुपारी बाराच्या आसपास गावातील ग्रामपंचायत जवळील गाव वेशीजवळ झाला.

पोलिसांना सदरच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वैराग पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक शिवाजी नाईक, पोलिस उपअधिक्षक रोहिदास पवार व पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.